Eknath Shinde | एकनाथ शिंदे कोरोनामुक्त, खासदार मुलासोबत रुग्णालयातून घरी

| Updated on: Oct 04, 2020 | 4:12 PM

एकनाथ शिंदे कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांनी त्यांची भेट घेतली. (Eknath Shinde cure from corona)

Eknath Shinde | एकनाथ शिंदे कोरोनामुक्त, खासदार मुलासोबत रुग्णालयातून घरी
Follow us on

मुंबई : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे कोरोनामु्क्त झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, इतर पोलीस अधिकारी, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते मुलासोबत घरी गेले. (Eknath Shinde cure from Corona)

एकनाथ शिंदेंनी 24 सप्टेंबरला स्वत: ट्विट करून कोरोना झाल्याची माहिती दिली होती. शिंदे यांनी पीपीई किट्स घालून सातत्याने रुग्णालयांची पाहणी केली होती, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. कोरोना संसर्ग झाल्यानंतर शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असताना कोणत्याही प्रकारची लोकोपयोगी कामे अडून राहू नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातूनच कामाला सुरुवात केलेली. एकनाथ शिंदेंना कोरोना संसर्ग झाल्याचे समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी होम हवन केले होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आराम करण्याचा सल्ला दिला होता.


एकनाथ शिंदे कोरोनामुक्त झाल्यामुळे राज्यातील सर्व शिवसैनिकांना आनंद झाला असल्याची भावना शिवसेना पदाधिकारी राहुल लोंढे यांनी व्यक्त केली. राज्यात कोरोना संसर्ग सुरु झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पीपीई किटस घालून रुग्णालयांची पाहणी करत होते, असे लोंढे यांनी सांगितले.

कोरोनाची लागण झालेले ठाकरे सरकारमधील मंत्री

कॅबिनेट मंत्री

1. जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : एप्रिल 2020 – कोरोनामुक्त
2. अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 25 मे 2020 – कोरोनामुक्त
3. धनंजय मुंडे – सामाजिक न्याय मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 12 जून 2020 – कोरोनामुक्त
4. अस्लम शेख – वस्त्रोद्योग मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 20 जुलै 2020 – कोरोनामुक्त
5. बाळासाहेब पाटील – सहकार मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 15 ऑगस्ट 2020 – कोरोनामुक्त
6. सुनील केदार – दुग्धविकास मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 3 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
7. नितीन राऊत – ऊर्जा मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 18 सप्टेंबर 2020
8. हसन मुश्रीफ – ग्रामविकास मंत्री (राष्ट्रवादी) – 18 सप्टेंबर 2020
9. वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण मंत्री (काँग्रेस) – 23 सप्टेंबर 2020
10. एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्री (शिवसेना) – 24 सप्टेंबर 2020

राज्यमंत्री

1. अब्दुल सत्तार – महसूल (शिवसेना) – कोरोनाची लागण : 22 जुलै 2020 – कोरोनामुक्त
2. संजय बनसोडे – पर्यावरण, रोहयो (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 2020 – कोरोनामुक्त
3. प्राजक्त तनपुरे – नगरविकास, ऊर्जा (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 7 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
4. विश्वजीत कदम – सहकार, कृषी (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 11 सप्टेंबर 2020
5. बच्चू कडू – शालेय शिक्षण (अपक्ष) – कोरोनाची लागण : 19 सप्टेंबर 2020

संबंधित बातम्या:

Eknath Shinde Corona | एकनाथ शिंदेंना कोरोना, आदित्य ठाकरेंनी दिला ‘हा’ सल्ला

Eknath Shinde | पीपीई कि्टस घालून रुग्णालयांची पाहणी, एकनाथ शिंदेंना कोरोना

(Eknath Shinde cure from Corona)