मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या शुक्रवारी रात्रीच्या संबोधनावर तसंच त्यांच्या कार्यकर्तृत्वार विरोधी पक्षाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच भाजप नेते सातत्याने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्याच भाजप नेत्यांचा समाचार घेतला आहे. टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे, अशा शब्दात आव्हाड यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतलाय. (Minister Jitendra Awhad tweet on Cm Uddhav Thackeray)
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेत्यांना फटकारलं आहे.
स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत. त्यास सलाम, असे कौतुकाचे शब्दही मुख्यमंत्र्यांबद्दल आव्हाड यांनी काढले आहेत.
“पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत.. त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!”, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काल (शुक्रवार) रात्रीच्या संवादावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाही. उपाययोजनाही सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. अपवादात्मक स्थितीत लॉकडाऊन करावा लागतो. पण तो नियम होता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करताना देशातील शेवटच्या घटकाचाही विचार केला होता. मुख्यमंत्र्यांनीही तेच करायला हवं. केवळ जगभरातील देशात कोरोना कसा वाढतो हे सांगून चालणार नाही, त्या देशांनी काय पॅकेज दिलेत हे सुद्धा पाह्यलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला.
(Minister Jitendra Awhad tweet on Cm Uddhav Thackeray)
हे ही वाचा :
मुख्यमंत्र्यांचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही; फडणवीसांचा टोला
जळगावमध्ये रेमेडीसेव्हिर इंजेक्शनचा तुटवडा, सरकार झोपलं काय? गिरीश महाजनांचा सवाल