‘शिकलेल्या मुलीच ‘लिव-इन’ च्या शिकार होतात!’ केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

| Updated on: Nov 18, 2022 | 12:30 PM

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य करणारे ते केंद्रीय मंत्री कोण?

शिकलेल्या मुलीच लिव-इन च्या शिकार होतात! केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य
वादग्रस्त विधान
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : मुंबईतील वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder News) या तरुणीच्या हत्याकांड प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत. हत्याकांडप्रकरणाचं गूढ उकलण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. श्रद्धाचा लिव ईन रिलेशनशिपमधील पार्टनर आफताब पुनावाला (Aftab Poonawala) यानेह श्रद्धाचा खून केला असल्याचं सिद्ध करण्यासाठी सध्या पोलिसांचे पुरावे शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र अशातच एका केंद्रीय मंत्र्यांनं (Central Minister) या हत्याकांड प्रकरणावर वादग्रस्त विधान केलं आहे. शिकलेल्या मुलीच लिव इन रिलेशनशिपचा शिकार होतात, असं केंद्रीय मंत्री म्हणाले.

केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी व्यक्त होताना केलेलं विधान चर्चेत आलं आहे. त्यांनी मुलींचं शिक्षण आणि लिव इन रिलेशन यांचा एकमेकांशी विचित्र पद्धतीने संबंध जोडला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आता टीकाही होऊ लागली आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्यावर निशाणा सााधलाय.

काय म्हणाले मंत्री महोदय?

केंद्रीय मंत्री कौशल किशोर यानी म्हटलंय, की…

या घटना अशा मुलींसोबत होत आहेत, त्या चांगल्या शिकलेल्या आहेत. ज्या मुलींना असं वाटतं की आपण आपल्या भविष्याचा निर्णय स्वतः घेऊ शकतो, ती क्षमता आपल्यात आहे, असं वाटणाऱ्या मुलींसोबत असे प्रकार घडत आहेत.

लोक लिव ईन रिलेशनशिपमध्ये का राहतायत? त्यांना तसं राहायचं असेल तर त्याची नोंदही कुठेतरी घेतली गेली पाहिजे. जर अशा व्यक्तींच्या पालकांना त्याचं नात सार्वजनिक जीवनात अमान्य असेल, तर अशा जोडप्यांनी कोर्टात जाऊन लग्न करावं आणि मग एकत्र राहावं.

शिकलेल्या मुलींनी अशा प्रकारचं नातं जोडू नये. शिकलेल्या मुली आई वडिलांची मर्जी नाकारुन असा निर्णय घेत असतील तर या प्रकारांसाठी त्या स्वतः जबाबदार आहेत. शिकलेल्या मुलींनी नेमकं असं त्या का करत आहेत, ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री कौशर किशोर यांनी केलेल्या या विधानामुळे वाद होणार, हे तर स्पष्ट होतं. दरम्यान, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या वक्तव्यावरुन तीव्र संपात व्यक्त केलाय.

प्रियंका चतुर्वेदी यांचं ट्वीट :

18 मे रोजी श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय. या हत्याकांड प्रकरणी अनेक आठवड्यांनंतर अखेर श्रद्धाच्या प्रियकरालाच हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. श्रद्धाचा प्रियकर आफताब याने तिची गळा दाबून हत्या केली होती.

हत्येनंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि नंतर काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या शरीराचे तुकडे फेकून देत मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. सध्या या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय.