मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी ही घोषणा केली आहे. (Minister Nawab Malik announcement to boost women entrepreneurship)
याशिवाय सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधील ३० टक्के निधी महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी वापरणे, विद्यार्थीदशेतच महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थिनी उद्योजकता क्लब’ स्थापन करणे असे विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी 48 टक्के महिला असून देशातील एकूण उद्योजकांपैकी फक्त 14 टक्के महिला उद्योजक आहेत. राज्यात सध्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता यापुढे या सर्व उपक्रमांमध्ये महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल. यासाठी सोसायटीमध्ये स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्यात येईल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
हे ही वाचा
Varsha Raut | वर्षा राऊत तीन तासांहून अधिक वेळ ED कार्यालयातच
इगो बाजूला ठेवा, पोलिसांवर दबाव आणू नका, देवयानी फरांदेंना नाशिक पोलीस आयुक्तांचा रोखठोक इशारा