जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा : विजय वडेट्टीवार

| Updated on: Jan 24, 2021 | 4:56 PM

भविष्यात कशाचीही पर्वा न करता संघर्ष करणार आहे," असेही विजय वडेट्टीवारांनी सांगितले. (Vijay Wadettiwar Speech During OBC Morcha in Jalna) 

जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा : विजय वडेट्टीवार
चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या बांधावर
Follow us on

जालना : ओबीसी समाजाची (OBC Marcha) स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला. “हा मोर्चा कुणाच्याही विरोधात नाही. हा फक्त आमच्या हक्कासाठी आहे. ओबीसी नेत्यांच्या स्वतंत्र जनगणना करावी,” अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. “कुणाला काय द्यायचं ते द्या, पण आमच्या हक्काचं आम्ही सोडणार नाही,” असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले. (Vijay Wadettiwar Speech During OBC Morcha in Jalna)

“तुम्ही निवेदन दिलं की मी ते प्रश्न सातत्याने मांडत आहे. मी पक्ष, धर्म, जातपात सोडून मी फक्त ओबीसी म्हणून लढत आहे. जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा. ही प्रेरणा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून मिळाली. ते आज हयात नाहीत. त्यांनी केलेल्या संघर्षाला सलाम केलं पाहिजे. मंत्री छगन भुजबळ यांनीही धुरा हाती घेतली ते ही लढत राहिले, हे ओबीसींच्या हक्कसाठी लढणारे नेते आहेत. भविष्यात कशाचीही पर्वा न करता संघर्ष करणार आहे,” असेही विजय वडेट्टीवारांनी सांगितले.

“विधानसभेत स्वतंत्र जनगणनेचा प्रस्ताव माडणार”

“आमच्या स्वतंत्र जनगणनेचा मार्ग मोकळा करा, अशी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे. विधानसभेत स्वतंत्र जनगणनेचा मी प्रस्ताव मांडणार आहे. पक्षाच्या पलीकडे लढाई जात नाही तोपर्यंत यश मिळणार नाही. बाळासाहेब सराटे नावाचा व्यक्ती आमचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोपही विजय वडेट्टीवारांनी केला.

“आम्ही वकील दिला. जर तो दिला नसता तर ओबीसचं आरक्षण रद्द झालं असतं. बारा बलुतेदारांचे स्वतंत्र महामंडळ स्थापन केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. महाज्योतीचं कार्यालय औरंगाबादला सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,” असेही वडेट्टीवार म्हणाले.

“ओबीसी नेत्यांनो इथे आलात आता सांभाळून राहावं लागेल. तुम्ही म्हणाल ती लढाई लढायला मी सज्ज आहे. पाठ नेहमी मजबूत असावी कारण शाबासकी आणि धोका हा नेहमी पाठीमागून होतो. जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा,” असेही वडेट्टीवारांनी म्हटले. (Vijay Wadettiwar Speech During OBC Morcha in Jalna)

संबंधित बातम्या : 

राज्यात ओबीसी मुख्यमंत्री हवा, जनगणनेसाठी ओबीसींचा राज्यभर एल्गार

पंकजा जेव्हा मोदी सरकारलाच ओबीसींना दिलेल्या ‘कुछ वादेंची’ आठवण करून देतात!