मुंबई : अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटपं जाहीर झालं (Ministers and Portfolio distribution of Congress). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली. त्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खातं कायम राहिलं आहे. इतर काँग्रेस नेत्यांकडेही विविध महत्त्वाची खाती देण्यात आली (Ministers and Portfolio distribution of Congress).
अशोक शंकरराव चव्हाण
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
अनिल वसंतराव देशमुख
गृह
विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
महसूल
डॉ.नितीन काशिनाथ राऊत
उर्जा
विजय वडेट्टीवार
इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन
वर्षा एकनाथ गायकवाड
शालेय शिक्षण
सुनिल छत्रपाल केदार
पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण
अमित विलासराव देशमुख
वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य
ॲड. के.सी. पाडवी
आदिवासी विकास
अस्लम रमजान अली शेख
वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास
ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने)
महिला व बालविकास
राज्यमंत्री
डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा
सतेज उर्फ बंटी डी. पाटील
गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण