मुंबई : संपर्काबाहेर असलेल्या राष्ट्रवादीच्या चार आमदारांना अखेर मुंबईत आणण्यात आलं आहे. या आमदारांना विमानाने परत आणलं गेलं. आता अजित पवार वगळता सर्वच आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत, असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Missing NCP MLAs Contact) यांनी केला.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार अनिल भाईदास पाटील आणि दौलत दरोडा यांना काल रात्री विमानाने मुंबईला आणलं. ते दोघं हरियाणातील गुरुग्राममध्ये असलेल्या एका हॉटेलात वास्तव्याला होते. तर आमदार नितीन पवारही काल मुंबईत दाखल झाले. आमदार नरहरी झिरवळ दिल्लीत एका सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती आहे. सर्व आमदारांना मुंबईतील ‘द हयात’ हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.
अनिल पाटील यांनी फेसबुकवरुन आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर बाबासाहेब पाटील यांनीही आपण पवारांसोबत असल्याचं फेसबुकवरुनच स्पष्ट केलं होतं.
राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले असून सध्या आपल्यासोबत 52 आमदार आहेत. एका आमदारावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. म्हणजेच केवळ अजित पवार सध्या सोबत नसल्याची माहिती आहे.
#UPDATE: Out of the 4 MLAs of NCP, who were reportedly missing, Nitin Pawar reached Mumbai y’day & another MLA Narhari Zirwal is currently at a safe location in Delhi. 2 MLAs Anil Patil & Daulat Daroda were brought to Mumbai, by a flight last night, by NCP leaders. #Maharashtra https://t.co/ndBmOmGW8F
— ANI (@ANI) November 25, 2019
नितीन पवार शनिवारी पक्षाच्या बैठकीला जात असल्याचे सांगून गेले ते परत आलेच नव्हते. तसेच त्यांच्याशी घरच्यांचा संपर्कही होत नव्हता. त्यामुळे त्यांच्या मुलाने पंचवटी पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
माझी काळजी करु नका, मी शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ, राष्ट्रवादी पक्षासोबत आहे. माझ्या कुटुंबाने इतर कोणताही विचार करु नये. कोणताही गैरसमज करुन घेऊ नये.’ असं नितीन पवार यांनी एका व्हिडीओद्वारे स्पष्ट केलं होतं.
आधी आऊट ऑफ रीच, आता संपर्क
नितीन पवार – कळवण (नाशिक)
दौलत दरोडा – शहापूर (ठाणे)
अनिल भाईदास पाटील – अमळनेर (जळगाव)
नरहरी झिरवळ – दिंडोरी (नाशिक)
माणिकराव कोकाटे – सिन्नर (नाशिक)
बाबासाहेब पाटील – अहमदपूर (लातूर)
दिलीप बनकर – निफाड (नाशिक)
मंत्रिपद आणि महामंडळांची खैरात
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत 27 आमदारांचं पाठबळ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या सर्व आमदारांवर मंत्रिपदांची खैरात होण्याची चिन्हं आहेत. कारण अजित पवारांच्या गटाला 12 मंत्रिपदं आणि 15 महामंडळं देण्याची तयारी भाजपने दर्शवल्याची माहिती आहे.
अजित पवार गटातील 27 आमदारांवर खैरात, भाजपची 12 मंत्रिपदं आणि 15 महामंडळं देण्याची तयारी?
अजित पवार यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्रिपदांच्या वाटाघाटी केल्याचं म्हटलं जातं. बैठकीला भाजपकडून विनोद तावडे, भूपेंद्र यादव आणि गिरीश महाजन यांचीही उपस्थिती असल्याची माहिती आहे.
Missing NCP MLAs Contact