अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले, अजितदादा गटाचा आमदार म्हणतो “फडणवीस यांनी…”

| Updated on: Aug 18, 2024 | 12:55 PM

भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली.

अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले, अजितदादा गटाचा आमदार म्हणतो फडणवीस यांनी...
Follow us on

Ajit Pawar Black flag Pune : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज ही जनसन्मान यात्रा पुण्यातील जुन्नर भागात आयोजित करण्यात आली आहे. मात्र या जनसन्मान यात्रेपूर्वी भाजपच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले. यावेळी भाजपकडून अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आता यावर अजित पवार गटाच्या एका आमदाराने प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबत त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करावा, अशी मागणीही केली आहे.

हे सुद्धा वाचा

अमोल मिटकरी काय म्हणाले?

“जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले, त्याबाबत श्री देवेंद्रजीनी तात्काळ खुलासा करावा”, असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

नेमकं काय घडलं?

विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जनसन्मान यात्रा सुरु केली आहे. अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज जुन्नर तालुक्यात आहे. यावेळी भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली.

जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी केला. तसेच अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही, याबद्दलही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे नारायणगावात अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी मोठी घोषणाबाजीही करण्यात आली. यानंतर नारायणगावमध्ये आंदोलन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.