अहमदनगर : शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल राठोड यांना आदरांजली देण्यासाठी अहमदनगरमध्ये हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी देखील अनिल राठोड यांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले (Shivsena leader Anil Rathod demise). मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीत उभा होतो, तरीही अनिल राठोड यांचे मला आशिर्वाद होते, असं मत निलेश लंके यांनी व्यक्त केलं. तसेच आपण सर्वजण पोरके झाल्याची भावना व्यक्त केली.
निलेश लंके म्हणाले, “आपल्या सर्वांचे दैवत अनिल भैया राठोड यांचं आज पहाटे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. भैया ही आगळीवेगळी शक्ती होती. या शक्तीने अहमदनगर जिल्ह्यातील गोरगरिब जनतेतील बरेच कुटुंब उभे करण्याचं काम केलं, त्यांना ताकद देण्याचं काम केलं. आज आपण सर्वजण पोरके झालो आहोत.”
VIDEO: ‘मी आज आमदार म्हणून बोलत असलो तरी ते फक्त भैयांचे आशिर्वाद’, आमदार निलेश लंके भावूक#NileshLanke #AnilRathod #Shivsena @ShivSena @NCPspeaks pic.twitter.com/OrCTHKKjtc
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 5, 2020
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“आज मी आमदार म्हणून जरी बोलत असलो तरी ते फक्त भैयांचे आशिर्वाद आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभा होतो तरी मला भैयांचे आशिर्वाद होते. त्यांच्यासारखी दुसरी शक्ती आपल्याला पाहायला मिळणार नाही. नगरमधील सर्वांच्या, सर्व पक्षियांच्यावतीने त्यांना आदरांजली अर्पण करतो,” अशी भावना लंके यांनी व्यक्त केली.
अहमदनगरला शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल राठोड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी अनेक राजकीय नेते, पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, यावेळी आदरांजली अर्पण करताना आमदार निलेश लंकेच्या भावना अनावर झाल्या. अखेर त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. त्यांना अनिल राठोड यांच्या जुन्या आठवणींनी गहिवरुन आलं.
‘रक्तात शिवसेना असलेले अनिल भैया गेल्यानं धक्का बसला’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
दरम्यान, अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबवला, अशा भावपूर्ण शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना आदरांजली दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “काही दिवसांपूर्वीच मी अनिल भैया यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. कोरोनातून हळूहळू त्यांच्या प्रकृतीला आराम मिळत होता. असं असतांनाच अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. हा आमच्या शिवसेना परिवारावर मोठा आघात आहे. तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या तमाम जनतेने सुद्धा त्यांचा आपला अनिल भैय्या गमावला आहे.”
“युती सरकारच्या काळात मंत्रीमंडळात असलेले अनिल राठोड म्हणजे हिंदुत्वाचा बुलंद आवाज होते. रस्त्यावर स्वत: उतरुन लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी शिवसेना नगर जिल्ह्यात अक्षरश: रुजवली. लोकांसाठी आंदोलने केली, त्यांच्या समस्यांची तड लावली. नगर शहरात तर त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आणि ते यशस्वी करुन दाखवले,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
अनिल भैया गेले हा मोठा आघात, लोकांसाठी जगलेला नेता गेला : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अनिल राठोड यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले, “माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. त्यांच्या निधनाने सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आम्ही सर्वजण त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही प्रार्थना.”
हेही वाचा :
Anil Rathod | सलग 25 वर्ष आमदारकी, शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन
Shivajirao Patil Nilangekar | माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन
Shivsena leader Anil Rathod demise