मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत (shivsena) बंडखोरी केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला 46 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर काही काळ एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh)वेगळाच गौप्यस्फोट केला आहे. नितीन देशमुख हे सुरतमध्ये बंडखोर आमदारांसोबत होते. त्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आल्याची बातमी देखील समोर आली होती. मात्र आता खुद्द नितीन देशमुख यांनीच प्रसारमाध्यमांसमोर येत मोठा खुलाला केला आहे. आपल्याा अटॅक वैगेरे काही आला नव्हता, मला बळजबरीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. माझा बीपी देखील नॉर्मल होता. मात्र तरी देखील मला अनेक इंजेक्श देण्यात आली, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
यावेळी बोतलतान नितीन देशमुख म्हणाले की, मला कुठल्याही प्रकाराच अटॅक आला नव्हता. मात्र त्यांनी मला अटॅक आल्याचे भासवले. त्यानंतर मला बळजबरीने इंजेक्श देण्यात आले. त्यांचा माझ्या बॉडीवर काहीतरी प्रयोग करून माझा घात करण्याचा उद्देश होतो. मात्र मी देवाच्या कृपेने वाचलो असा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे.
मी आमच्या मंत्र्यांसोबत सुरतमध्ये फिरण्यासाठी गेलो होते. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. मी नॉर्मल असताना देखील मला हार्ट अटॅक आला आहे असे सगळीकडे सांगण्यात आले. मी पूर्ण ठणठणीत होतो. माझा बीपी देखील नॉर्मल होता. मात्र मला बळजबरीने इंजेक्श देण्यात आल्याचा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे.
नितीन देशमुख यांनी म्हटले आहे की, मी शिवसैनिकच आहे. मी उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मी कायम शिवसेनेसोबतच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र नितीन देशमुख यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी संजय राऊत यांनी देखील आमदारांवर दबाव टाकून त्यांचे आपहरण करून त्यांना बळजबरीने सुरतला नेण्यात आल्याचा आरोप केला होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, मग आमदार सुरतवरून आसामला बळजबरी गेला का असा सवाल उपस्थित केला आहे.