अहमदनगर : भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर तीस लाखांच्या बक्षीसावरुन जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला आ. रामदार रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. गावात गटतट नसावेत असा माझा प्रामाणिक उद्देश आहे पण त्यांचा उद्देश गटतट असावेत असा आहे, असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी शिंदे यांना दिलंय. (MLA Rohit Pawar Answer Ram Shinde Criticism)
“गावात गटतट असावेत असावे असा प्रामाणिक हेतू त्यांचा असावा मात्र माझा हेतू गटतट नसावेत असा आहे. गावच्या विकासासाठी सर्व लोक एकत्र येत असतील तर त्याला काय हरकत आहे”, असा सवाल त्यांनी राम शिंदे यांना केला.
“बक्षीस जाहीर करण्यापाठीमागे माझा प्रामाणिक हेतू होता की गावकऱ्यांनी तट तट विसरुन विकासाचं राजकारण करावं. त्यांना विकासचं काम कळत नसेल. त्यांना गटतट कळत असतील तर त्याला मी काय करु”, असा टोला रोहित पवार यांनी राम शिंदे यांना लगावला.
“एकतर राम शिंदे काय बोलतात त्यापेक्षा लोकांना काय पाहिजे, हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे, असा टोला लगावत लोकांच्या हिताच्या दृष्टीनेच मी या पुढे काम करत राहील”, असं रोहित पवार म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तीस लाखाचे बक्षीस जाहीर केले. मात्र असे बक्षीस जाहीर करणे म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे अशी टीका राम शिंदे यांनी केली होता. रोहित यांच्या प्रलोभनाची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी राम शिंदे यांनी केली होती.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तीस लाखाचे जाहीर केले आहे. हे बक्षीस म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने रोहित पवारांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राम शिंदेंनी केली आहे.
रोहित पवार ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी तीस लाखांचा निधी जाहीर करत आहेत. मात्र, असंच सुरु राहील तर पुढील काळात टाटा बिर्ला देखील आमदार- खासदार होतील, असा टोला राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावला आहे.
हे ही वाचा :
…तर भविष्यात टाटा बिर्ला आमदार खासदार होतील, राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला
ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची