बीड : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती रविवारी उत्साहात साजरी झाली. यानिमित्त बीड शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar Fugadi) आणि त्यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर देखील शोभायात्रेत सहभागी झाले होते. (MLA Sandeep Kshirsagar Fugadi)
शोभायात्रेत फुगड्यांचे घेर रंगले. त्यावेळी उपस्थितांनी क्षीरसागर दाम्पत्यालाही फुगडी खेळण्याचा आग्रह केला. मग आमदार संदीप क्षीरसागर आणि नेहा क्षीरसागर यांनी अखेर फुगडी घालून उपस्थितांना प्रतिसाद दिला. आमदाराने पत्नीसोबत फुगडी खेळल्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
VIDEO :