मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणूकीवरून (Legislative Council elections) राज्यातील राजकारण चांगलेच गरम झाले आहे. त्यातच प्रत्येक पक्षाला एक एक मत गरजेचे असताना आता पहिला धक्का राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) बसला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदानात दोन ची तुट झाल्याचे समोर आले आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसची एक मतं ही बाद झालं आहे. तर भाजपचेही एक मतं बाद झालं आहे. या बाद मतांचा कोणाला फायदा होणार की मागच्या वेळी प्रमाणे महाविकास आघाडी सरकारला धक्का बसणार अशी चिंता अनेकांना पडली आहे. तसेच एक मत कमी झाल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फटका बसणार का हे पहावं लागणार आहे. कारण मतांचा कोटा हा 29 असताना आता तो 28 झाला आहे. तर याच्याआधीच राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबळकर (Ramraje Naik Nimbalkar) हे सेफ झाले आहेत. मात्र एकनाथ खडसेंच काय असा सवाल आता प्रत्येकाच्याच मनात पडत आहे.
आज विधान परिषदेच्या निवडणुक पार पडली असून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. तर याचदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक एक मत बाद झालं आहे. त्यामुळे याचा फटला थेट एकनाथ खडसेंना बसण्याची शक्यता आहे. तर कारण राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबळकर यांच्या कोट्यातलं एक मद बाद ठरवण्यात आलं आहे. तर भाजप उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातलं एक मतही बाद ठरवण्यात आलं आहे. याचं कारण म्हणजे या दोन्ही मतपत्रीकांवर पेनानं गिरव्यात आल्याचे समोर आले आहे. तर हे छाननीत समोर आले आहे. त्यामुळे ते मा आतपत्रिका बाजुला करण्यात आल्या आहेत. तसेच छाननीनंतर त्या निवडणूक आयोगाने बाद ठरवल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसनं 28 मतांचा कोटा ठरवला आहे. उमेदवाराला विजयासाठी 26 मतांची गरज आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकूण 51 मतं आहे. मात्र आता त्यातील आता एक मत बाद करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर हे सेफ झाले आहेत. तर एक मत बाद झाल्याने आता खडसेंच मार्गात अडसर आला आहे. कारण आता 51 पैकी राष्ट्रवादीकडे 23 मतं उरतात.