चंद्रपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जाव (Mns Diwali celebration in potholes) लागतं. खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेकांना त्रासाला सामोरी जावं लागलं आहे. खड्ड्यांमुळे दुचाकीवरुन पडून आतापर्यंत अनेकांना प्राणही गमवावे लागले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेने चक्क खड्ड्यांसोबत दिपोत्सव साजरा केला आहे. चंद्रपूरचे नगरसेवक सचिन भोयर यांनी हे अनोख आंदोलन केलं (Mns Diwali celebration in potholes) होतं.
चंद्रपूर शहरातील वरोरा नाका उड्डाणपुलावर अतिशय मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे लोकांचा जीव जाण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते असा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिवाळीचे औचित्य साधून खड्ड्यांसोबत दिपोत्सवानिमित्त साग्रसंगीत आतिषबाजी केली. तसेच या खड्ड्यांच्या आजूबाजूला दिवेही लावण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
विशेष म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांनी एवढ्यावर न थांबता या खड्ड्यात बसून भाऊबीजही साजरी केली. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बहिणींकडून ओवाळूनही घेतलं. त्यावेळी आपल्या कुटुंबातील सर्व लोकांना खड्ड्यांपासून सुरक्षा मिळावी अशीही त्यांनी देवाकडे प्रार्थना केली.
चंद्रपुरातील जनतेची संपूर्ण दिवाळी खड्ड्यांमध्ये गेली आहे. शहरातील रस्त्यांसह अनेक उड्डाणापुलावरही जीवघेणे खड्डे पडल्याचे पाहायला मिळत आहे. या झोपलेल्या प्रशासनाला जागृत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी खड्ड्यांच्या आजूबाजूला दिवे लावून प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आहोत अशी प्रतिक्रिया चंद्रपूरचे नगरसेवक सचिन भोयर यांनी व्यक्त केली (Mns Diwali celebration in potholes) आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेच्या अनेक उमेदवारांचा निसटता पराभव झाला होता. त्यानंतर संदीप देशपांडे, अखिल चित्रे, नयन कदम यांसह मनसेचे अनेक नेते पुन्हा एकदा स्थानिक प्रश्नावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
संबंधित बातम्या :
मनसे नेते संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला, 14 नोव्हेंबरपर्यंत कोठडी
संदीप देशपांडे 14 दिवस कोठडीत, आता मनसेचा दुसरा नेताही पोलिसांच्या ताब्यात
आधी संदीप देशपांडे शरद पवारांच्या भेटीला, आता राष्ट्रवादीचा आमदार राज ठाकरेंच्या घरी!
शरद पवारांच्या कार्यपद्धतीने प्रभावित, संदीप देशपांडे ‘सिल्व्हर ओक’वर