अमितच्या लग्नाला अहमद पटेलांची उपस्थिती, ‘काँग्रेसचा चाणक्य’ हरपल्याने राज ठाकरेही हळहळले

| Updated on: Nov 25, 2020 | 2:35 PM

राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहित अहमद पटेल यांच्याप्रति भावना व्यक्त केल्या. Raj thackeray Ahmed patel

अमितच्या लग्नाला अहमद पटेलांची उपस्थिती, काँग्रेसचा चाणक्य हरपल्याने राज ठाकरेही हळहळले
Follow us on

मुंबई :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर विविध राजकीय पक्षाचे नेते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास फेसबुक पोस्ट लिहित अहमद पटेल यांच्याप्रति भावना व्यक्त केल्या आहेत तसंच त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. (MNS Chief Raj thackeray Tribute Ahmed patel through Facebook Post)

“काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल ह्यांचं कोरोनाने निधन झालं. अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते. राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते. पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली. तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरलं नाही”, असं राज ठाकरे यांनी आवर्जून नमूद केलं आहे.

“अहमद पटेल यांनी राजकारणातील अलौकिक क्षमतेला व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरलं नाही. त्यामुळेच खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते, असं राज म्हणाले.  राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुःखांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे”, अशीही आठवण राज यांनी जागवली आहे.

“सक्रिय राजकारणात 43 वर्ष राहून तसंच अहमद पटेल ह्यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतः सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच”, असं म्हणत सरतेशेवटी राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ अहमद पटेल ह्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘राज’पुत्र अमित ठाकरेंच्या लग्नसोहळ्याला अहमद पटेल यांची खास उपस्थिती

27 जानेवारी 2019 ला ‘राज’पुत्र अमित ठाकरे यांचा मिताली बोरुडेशी विवाह संपन्न झाला. या सोहळ्याला दिग्गज नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही सोहळ्याचं निमंत्रण होतं. मात्र काही कारणांमुळे ते येऊ न शकल्याने गांधी कुटुंबीयांच्या वतीने खास प्रतिनिधी म्हणून अहमद पटेल यांनी उपस्थिती लावली होती.

लग्न सोहळा संपन्न झाल्यानंतर राज ठाकरेंनी विवाहस्थळापासून 11 किलोमीटरवर असलेल्या ‘ताज महाल पॅलेस’मध्ये अहमद पटेल यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी अहमद पटेल यांच्याशी 10 ते 15 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर राज पुन्हा विवाहस्थळी गेले. मात्र 10 मिनिटांच्या चर्चेसाठी राज ठाकरे ‘ताज’मध्ये आल्याने अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या.


संबंधित बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अहमद पटेल यांचे निधन, मुलगा फैजल पटेल यांची ट्विटरद्वारे माहिती

…जेव्हा इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचीही ऑफर अहमद पटेलांनी नाकारली!

‘लडका छोटा हैं तो क्या हुआ?, बडा हमें ही करना हैं’, सत्यजीत तांबेंसाठी अहमद पटेलांचा थेट ठाकरेंना फोन

अहमद पटेल यांचं दु:खद निधन, गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते काँग्रेसचे ‘चाणक्य’ पर्यंतचा प्रवास

(МNS Chief Raj thackeray Tribute Ahmed patel through Facebook Post)