मुंबई : खळबमहाराष्ट्रात ळ उडवून देणाऱ्या घटनेनं शुक्रवारचा दिवस गाजला. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep deshpande) यांच्यावर भर शिवाजी पार्कमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला नेमका कुणी केला आणि त्यामागील हेतू काय आहे, हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. पोलिसांनी या दिशेने वेगाने तपास सुरु केला आहे. नुकतीच मुंबई पोलिसांच्या वतीने संशयित आरोपींची दोन छायाचित्र सादर करण्यात आली आहे. काल दिवसभर दादर, शिवाजी पार्क परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी खंगाळून काढली. यापैकी दोन सीसीटीव्ही व्हिडिओ पोलिसांनी जारी केले आहेत. तर दोन चेहरे या घटनेतील आरोपी असल्याचं सांगण्यात येतय. या प्रकरणी काल 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Mumbai | Police have formed 8 teams to nab the accused in the case of an attack on MNS leader Sandeep Deshpande at Shivaji Park yesterday.
(CCTV visuals of two accused shared by Police) pic.twitter.com/pAXTt38jDo
— ANI (@ANI) March 4, 2023
संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला नेमका कुणी केला, या तपासासाठी पोलिसांनी आठ तपास पथकं नेमली आहेत. पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. भांडूप परिसरातून या दोघांना पोलिसांनी पकडल्याची माहिती समोर आली आहे. राजकीय वादातून हल्ला झाल्याचं आरोपींच्या चौकशींतून पुढे आलं आहे. यापैकी एका आरोपीचं नावही कळलंय, मात्र तो शिवसेनेचा कार्यकर्ता आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल म्हणजेच ३ मार्च रोजी शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हल्ला झाला. संदीप देशपांडे हे नेमहीप्रमाणे दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. नेहमी त्यांच्यासोबत काही मित्र असतात. मात्र काल ते एकटेच होते. हीच संधी हेरून हल्लेखोरांनी मागून येऊन त्यांच्यावर वार केले. हल्लेखोरांच्या हातात स्टंप आणि रॉड होते. संदीप देशपांडे यांनीही तत्काळ प्रतिकार केला. त्यानंतर आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. त्यामुळे हल्लेखोर पळून गेले. मात्र या झटापटीत संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला दुखापत झाली. त्यांच्यावर तत्काळ हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले.