मुंबई : “परप्रांतीयांवोराधात लढण्यासाठी राज ठाकरेंनी शिवसेनेला साद घातली, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म सूत पुत्रा”, अशा शब्दात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसनेसा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘राज ठाकरे हे ठाकरे ब्रॅण्डचा एक घटक आहेत. मराठी, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी सगळ्या ठाकरेंनी एकत्र यावे’, अशी साद शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंना दिली होती. त्याववर संदीप देशपांडे यांनी आता उत्तर दिलं आहे (Sandeep Deshpande Criticize Shivsena).
संदीप देशपांडे काय म्हणाले?
“पक्षाची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील. मात्र, ज्यावेळी राज ठाकरे हे परप्रांतीयांविरोधात लढत होते, तेव्हा शिवसेनेचे नेते गप्प होते. पाकिस्तानी कलाकारांविरोधात आम्ही लढत होतो, तेव्हा शिवसेना गप्प होती. रातोरात आमचे सहा नगरसेवक चोरले गेले, तेव्हा शिवसेनेने डाव साधला. 2014 आणि 2017 मध्ये राज ठाकरेंनी परप्रांतीयांवोराधात लढण्यासाठी शिवसेनेला साद घातली होती, तेव्हा शिवसेना गप्प होती. महाभारतात जेव्हा कर्णाचं चाक चिखलात रुतलं, त्यावेळी कृष्णाने जे कर्णाला सांगितलं ते आता मला सांगावंसं वाटत आहे, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म सूत पुत्रा”, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली.
“घटक मला माहित नाही. मात्र, राज साहेबांमध्ये बाळासाहेबांचा खरा बाणा दिसतो”, असंही संदीप देशपांडे म्हणाले.
Sandeep Deshpande Criticize Shivsena
महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा – संजय राऊत
“‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल”, अशी चिंता संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही फटका बसेल, संजय राऊतांची ‘रोखठोक’ भूमिका https://t.co/eIzIOC9qeJ @rautsanjay61 @RajThackeray @mnsadhikrut #Saamana #ThackerayBrand @PawarSpeaks @akshaykumar @BJP4Maharashtra #KanganaRanaut
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2020
Sandeep Deshpande Criticize Shivsena
संबंधित बातम्या :
बाळासाहेब ते उद्धव ठाकरे, शिवसेना-मनसेतील साद-प्रतिसादाचा इतिहास
जितेंद्र आव्हाडांकडून बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ शेअर
बदनामीकारक व्यंगचित्रामुळे हल्ला, सेनेकडून अप्रत्यक्ष समर्थन, भाजपची सडकून टीका