मुंबई : शिवसेनेने आधी भाजपची लाचारी केली, आता काँग्रेसची लाचारी करत आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep deshpande criticized on Shivsena) यांनी शिवसेनेवर केली. संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत सावरकरांच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“शिवसेनेच्या नेतृत्वाने गेली पाच वर्षे भाजपची लाचारी केली आता काँग्रेसची करत आहे. जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ज्यांच्या पोटात आग आहे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की लाचारीची श्रीखंड पुरी खायची की राजसाहेबांना साथ देऊन कष्टाची मीठ भाकर खायची”, असं ट्वीट संदीप देशपांडेनी केले आहे.
शिवसेना नेतृत्वाने गेली पाच वर्षे भाजप ची लाचारी केली आता काँग्रेस ची करतायत ,जे मा. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ज्यांच्या पोटात आग आहे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की लाचारी ची श्रीखंड पुरी खायची की राजसाहेबांना साथ देऊन कष्टाची मीठ भाकर खायची
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 15, 2019
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांवरुन केलेल्या वक्तव्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. सर्वच स्तरातून राहुल गांधींवर टीका होत आहेत. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी आता भाजपकडून (Sandeep deshpande criticized on Shivsena) केली जात आहे.
नुकतेच राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना भारतात मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया सुरु असल्याचे म्हटले होते. यावरुन भाजपने तसेच भाजपच्या महिला खासदारांनी राहुल गांधींना घेरले होते. त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर काल (14 डिसेंबर) राहुल गांधींनी नवी दिल्लीत “मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. मी कधी माफी मागणार नाही”, असं वादग्रस्त विधान केले. त्यामुळे राहुल गांधींवर आता सर्वच स्तरातून टीका होत आहे.