मुंबई : दादर-माहिममध्ये लावलेले कंदील हटवण्यावरुन झालेल्या वादानंतर अटक झालेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर देशपांडेंची 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर मुक्तता करण्यात आली. सत्र न्यायालयाने संदीप देशपांडेंना जामीन (MNS Sandeep Deshpande bail) मंजूर केला.
सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह माजी नगरसेवक संतोष धुरी, शशांक नागवेकर, संतोष साळी यांना 14 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र वैयक्तिक जात मुचलक्यावर सर्व आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे.
दादर-माहीममध्ये मनसेने लावलेले कंदील महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी हटवले होते. महापालिकेने हे कंदील काढून कचऱ्यात टाकल्यामुळे संदीप देशपांडे यांनी किरण दिघावकर यांना फैलावर घेतलं होतं. यावेळी त्यांनी
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळही केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर संदीप देशपांडेंना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा ठपका संदीप देशपांडे यांच्यावर ठेवण्यात आला होता.
संदीप देशपांडे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 353 नुसार शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला न्यायालयाने संदीप देशपांडे यांना जामीन नाकारल्यामुळे त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. 14 तारखेपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर न्यायदंडाधिकारी पी एस काळे यांनी दिले होते.
विधानसभा निवडणुकीत मनसेच्या अनेक उमेदवारांचा निसटता पराभव झाला होता. माहिम मतदारसंघात शिवसेनेच्या सदा
सरवणकर यांच्याकडून संदीप देशपांडेंना पराभवाचा सामना (MNS Sandeep Deshpande bail) करावा लागला होता. त्यानंतर अखिल चित्रे, नयन कदम यांसह मनसेचे अनेक नेते पुन्हा एकदा स्थानिक प्रश्नावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
संबंधित बातम्या :
मनसे नेते संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला, 14 नोव्हेंबरपर्यंत कोठडी