Marathi News Politics Mns leader vasant more son threatened be careful rupesh facebook post also in discussion
Vasant More : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी, सावध राहा रुपेश! फेसबुक पोस्टही चर्चेत
सावध राहा रुपेश! अशा आशयाची चिठ्ठी ही रुपेश मोरेंच्या गाडीवर ठेवण्यात आली होती. तशी तक्रार त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत केली आहे. त्यामुळे ही धमकी कुणी दिली? हे शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.
मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी
Image Credit source: tv9
Follow us on
पुणे : मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) हे सतत चर्चेत असतात. पुणे महानगरपालिकेतही त्यांचा मोठा दबदबा आहे. मात्र आता वसंत मोरे यांच्या मुलालचं धमकीचं पत्र (Threat Latter) आल्याने खळबळ माजली आहे. सावध राहा रुपेश! अशा आशयाची चिठ्ठी ही रुपेश मोरेंच्या गाडीवर ठेवण्यात आली होती. तशी तक्रार त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत (Pune Police) केली आहे. त्यामुळे ही धमकी कुणी दिली? हे शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे. कोरोना काळात आपल्या कामामुळे वसंत मोरे हे नेहमीच चर्चेत राहिले. त्यानंतर अलिकडेच राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंगे उतरवण्याचा आदेश दिल्यानंतरही नाराजी व्यक्त केलेले आणि मनसेच्या पुन्हा जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतरही राज ठाकरेंशी निष्ठा कायम ठेवणारे वसंत मोरे महाराष्ट्राने पाहिले आहेत. कालच एका महिलेल्या दीर बनून केलेल्या त्यांच्या मदतीचेही राज्यभर कौतुक होत आहे, मात्र आता या धमकी प्रकरणाने पुण्यात खळबळ माजली आहे. या धमकी प्रकरणाबाबतही वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्टही लिहिली आहे. त्या पोस्टवरही एक नजर टाकूयात…
वसंत मोरंच्या फेसबुक पोस्टमध्ये काय?
मुलगा म्हंटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हंटले की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो…
आमचेही अगदी तसंच आहे,
पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही…
राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही…
गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हते,
पण आज ठरवले तुमच्या सोबत बोललच पाहिजे…
साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली,
त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायफर मध्ये
“सावध रहा रुपेश”
आशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली…
तसा तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो तरीही असे का ?
हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय…
आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबा बाबतीत असा विचार करायचा ?