कल्याण : केडीएमसीत भाजपच्या कालच्या ठिय्या आंदोलनावर मनसे आमदार राजू पाटील यांनी (MNS MLA Raju Patil) टीका केली आहे. शिवसेना-भाजपमध्ये सहा महिन्यांपूर्वी राजकीय घटस्फोट झाला. भाजप दायित्वापासून दूर जाऊ शकत नाही. 25 वर्षांपासून भाजप त्यांच्यासोबत सत्तेत होती. त्यामुळे शहराचे वाटोळे करण्यात भाजपचाही तितकाच सहभाग आहे, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे (MNS MLA Raju Patil).
कल्याण ग्रामीणमधील 27 गावातील आठ पटीने मालमत्ता कराची आकारणी केली जात आहे. त्यापैकी 18 गावे वगळण्यात आली आहेत. तर 9 गावे महापालिकेत आहे. त्या 9 गावातील नागरीकांना लावण्यात आलेल्या जास्तीच्या मालमत्ता करात सुधारणा करण्यात यावी या मागणीसाठी राजू पाटील यांनी आज आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.
या दरम्यान, त्यांनी कल्याण-डोंबिवलीतील रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात बोलताना “पत्री पुलाचे ज्या प्रकारे काम सुरु आहे, तो जगातील आठवा अजूबा होणार असे वाटतंय”, अशी टीका त्यांनी केली. या पुलावरून महापालिकेत येताना त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नागरीकांना किती त्रास सहन करावा लागतो. याकडेही आमदारांनी लक्ष वेधले (MNS MLA Raju Patil).
विविध विकास कामे होत नाहीत, यासाठी काल भाजप नगरसेवक आणि भाजप आमदार चव्हाण यांनी महापालिकेत आंदोलन केलं होतं. केडीएमसीत भाजपच्या कालच्या ठिय्या आंदोलवर केली आहे. शिवसेना-भाजपमध्ये सहा महिन्यापूर्वी राजकीय घटस्फोट झाला आहे. भाजप दायित्वापासून दूर जाऊ शकत नाही. 25 वर्षांपासून भाजप त्यांच्यासोबत सत्तेत होती. त्यामुळे शहराचे वाटोळे लावण्यात भाजपचाही तितकाच सहभाग आहे अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.
नवी मुंबईत पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान भाष्य करताना आमदार पाटील यांनी सांगितलं. “मी फक्त चार माणसं घेऊन गेलो होते. त्याठिकाणी निमंत्रणा व्यतिरिक्त लोक आले. हे सगळं होत राहतं. त्याला राजकीय दृष्टीने बघणे ठीक नाही. मी जी काही सूचना करायची होती ती केली आहे”, असं ते यावेळी म्हणाले.
जावई बापू डोंबिवलीकडे लक्ष द्या, मनसेच्या एकमेव आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोलाhttps://t.co/DOK7UO1u73 #cmuddhavthackeray #mns #RajThackeray @mnsadhikrut @ShivSena @OfficeofUT
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 12, 2020
MNS MLA Raju Patil
संबंधित बातम्या :