कोणाला पाठींबा? राज ठाकरेंच्या एकमेव आमदाराचे ठरलंय

| Updated on: Oct 29, 2019 | 11:21 PM

"मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेला अनुसरुन त्यांच्या आदेशाप्रमाणे योग्य तो निर्णय घेईल." राजू पाटील यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी बोलताना ही प्रतिक्रिया (MNS MLA Pramod (Raju) Patil) दिली.

कोणाला पाठींबा? राज ठाकरेंच्या एकमेव आमदाराचे ठरलंय
Follow us on

कल्याण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव नवनिर्वाचित आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी कल्याण ग्रामीणमधून विजय (MNS MLA Pramod (Raju) Patil) मिळवला. यानंतर त्यांच्याकडे अनेकांनी ते कोणाला पाठींबा देणार याविषयी विचारणा केली असता ते म्हणाले, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेला अनुसरुन त्यांच्या आदेशाप्रमाणे योग्य तो निर्णय घेईल.” राजू पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना ही प्रतिक्रिया (MNS MLA Pramod (Raju) Patil) दिली.

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर पहिल्या सभेत विरोधी पक्ष नेत्यासाठी निवडून द्या अशी भूमिका जाहीर केली होती. आम्ही 104 जागा उभ्या केल्या असून त्या सत्तेसाठी केल्या नव्हत्या. ती संख्या येत नव्हती. त्यावेळी राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट होती. त्यामुळे आताही त्यांच्या भूमिकेला अनुसरुनच पुढील निर्णय घेतला जाईल,” अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ बोलताना दिली आहे.

राज्यात सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरु आहे. सत्ता स्थापनेचे गणित जुळून येत नसल्याने सत्ता स्थापन झालेली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्याच्या विधी मंडळात सक्षम विरोधी पक्षाची भूमिका लढवण्यासाठी 288 पैकी 104 जागा लढवल्या होत्या. त्यातील कल्याण ग्रामीण या मतदारसंघातून आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी विजय (MNS MLA Pramod (Raju) Patil) मिळवला.

राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे यापुढील काळात तेच मनसेची सरकारविरोधी भूमिका विधिमंडळात मांडणार आहेत. त्यांना 86233 मते मिळाली. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रमेश म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. म्हात्रे यांनी राजू पाटील यांना कडवी झूंज दिली. रमेश म्हात्रे यांना 80665 मते मिळाली आहेत.

मनसेने इतर पक्षांच्या तुलनेत काहीशी उशिराने विधानसभा निवडणुकीत उडी घेतली. सुरुवातीला मनसे निवडणूक लढणार की नाही याबद्दल संभ्रम होता. मात्र, त्यानंतर स्वतः राज ठाकरे यांनी समोर येत भूमिका स्पष्ट केली आणि निवडणूक लढण्याची घोषणा केली. राज ठाकरेंनी राज्यभरात मोजक्या ठिकाणी सभा घेत मनसेला राज्यातील सक्षम विरोधीपक्ष बनण्यासाठी जनमत मागितले. मात्र, या निकालात त्यांना केवळ कल्याण ग्रामीण मतदारसंघातच यश आलं आहे.

मनसेने या विधानसभा निवडणुकीत एकूण 110 उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. त्यापैकी मनसेला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. मात्र, किती उमेदवार लढणार याची आकडेवारी सांगितली नाही. दररोज चार-पाच उमेदवारांची नावं जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी 110 उमेदवारांची नावं जाहीर केली.

राज ठाकरेंनी 2006 मध्ये शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली होती. तेव्हापासून राज ठाकरेंच्या राजकीय वाटचालीत अनेक चढउतार पाहायला मिळाले. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात 2009 मधील विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. 2014 मध्ये मनसेचा केवळ 1 आमदार निवडून आला होता.

संबंधित बातम्या : 

अखेर मनसेनं खातं उघडलं

मनसेच्या एकमेव आमदाराला खुद्द राज ठाकरेंकडून खुर्चीची ऑफर

मनसेला मतदान करणारा ‘मराठी माणूस’ शिवसेनेकडे!