एकीकडे उद्धव ठाकरेंचा शपथविधी, दुसरीकडे अमित ठाकरेंचा पहिलाच मोर्चा

| Updated on: Nov 27, 2019 | 8:37 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit thackeray navi mumbai protest) यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच विशाल महामोर्चा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.

एकीकडे उद्धव ठाकरेंचा शपथविधी, दुसरीकडे अमित ठाकरेंचा पहिलाच मोर्चा
Follow us on

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit thackeray navi mumbai protest) यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच विशाल महामोर्चा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा उद्या (28 नोव्हेंबर) सिवूड स्टेशन ते नवी मुंबई महापालिका असा काढण्यात येणार आहे. कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा (Amit thackeray navi mumbai protest) काढण्यात येत आहे.

महानगरपालिकेतील साडेसहा हजार कंत्राटी कामगारांची 14 महिन्यांची, तर घंटागाडी कामगारांची 43 महिन्यांची थकबाकी न दिल्याच्या निषेधार्थ महापालिका मुख्यालयावर थाळीनाद महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगितलं जात आहे.

“सीवूड स्टेशन ते नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत थाळीनाद महामोर्चा काढण्यात येणार आहे. साडे सहा हजार कामगारांच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा आम्ही काढत आहोत. या मोर्चात मोठ्या प्रमाणात नवी मुंबईकरांनी सहभागी व्हावे”, असं आवाहन नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे.

दरम्यान, उद्या राज ठाकरे यांचे बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. या शपथविधीला राज ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंचा शपथविधी तर दुसरीकडे अमित ठाकरे आपल्या नेतृत्वात पहिल्यांदाच महामोर्चा काढत आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष या मोर्चाकडे लागले आहे.

उद्धव ठाकरेंचा शपथविधी

शिवसेना पक्षप्रमुख आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकासआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे उद्या (गुरुवार 28 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या विस्तीर्ण मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी (Uddhav Thackeray Oath Ceremony Preparation) शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे.

जिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज घुमला, त्या शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेच्या साक्षीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.