मनसेच्या संघटनात्मक बांधणीची मदार बारामतीवर!

| Updated on: Jan 24, 2020 | 6:59 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील बदलाचे पाऊल टाकताना संघटनात्मक बांधणीची जबाबदारी बारामतीच्या अॅडव्होकेट सुधीर पाटसकर यांच्यावर दिली.

मनसेच्या संघटनात्मक बांधणीची मदार बारामतीवर!
Follow us on

बारामती : राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात बारामतीने नेहमीच महत्वाची भूमिका निभावली आहे. राज्यात पुलोदच्या सरकार स्थापनेपासून ते आताच्या महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेपर्यंत बारामतीच केंद्रबिंदू राहिलं आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील बदलाचे पाऊल टाकताना संघटनात्मक बांधणीची जबाबदारी बारामतीच्या अॅडव्होकेट सुधीर पाटसकर यांच्यावर दिली (Adv. Sudhir Pataskar). त्यामुळे आता मनसेची पक्षवाढीची मदारही बारामतीवरच राहणार आहे (Adv. Sudhir Pataskar).

कोण आहेत सुधीर पाटसकर?

सुधीर पाटसकर हे बारामतीतले नामांकित वकील आहेत. ते राज ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशापासूनचे कट्टर समर्थक आहेत. अगदी अखिल भारतीय विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या सुधीर पाटसकरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही जिल्हाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष या पदांवर काम केलं. काल मुंबईत झालेल्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी सुधीर पाटसकर यांच्यासह वसंत फडके यांच्यावर संघटनात्मक बांधणीची जबाबदारी दिली.

सुधीर पाटसकर यांनीही आपल्याला मिळालेल्या जबाबदारीबद्दल समाधान व्यक्त करत पक्ष वाढीसाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहणार असल्याचं म्हटलं.

पाटसकर यांच्या निवडीमुळे बारामतीतील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पाटसकर यांनी आजपर्यंत निष्ठावंत म्हणून केलेल्या कामाची ही पावती मिळाल्याचं इथले कार्यकर्ते सांगतात. त्यांच्या माध्यमातून पक्षाचा नक्कीच विस्तार वाढेल असाही विश्वास इथले कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

पाटसकर यांच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी संघटन वाढीची जबाबदारी बारामतीवर सोपवली. त्यामुळे आता पाटसकर हे मनसेच्या वाढीसाठी कशा पद्धतीने काम करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.