मुंबई : नुकतंच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. त्यातून त्यांनी अंधेरी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने एक भावनिक आवाहन केलं. त्याची दखल देवेंद्र फडणवीसांनीही (Devendra Fadnavis) घेतली. आता पुन्हा एकदा मनसेच्या वतीने देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिण्यात आलं आहे. यातून एक मागणी करण्यात आली आहे.
मनसे नेते मनोज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचं आवाहन केलं आहे. सणासुदीच्या काळात पोलिसांना आर्थिक पाठबळ मिळावं, त्यांचं आर्थिक समाधान व्हावं, असं मनोज चव्हाण यांनी या पत्रात म्हटलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक होती. अशातच राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आणि भाजप उमेदवाराची उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत त्यांनी गळ घातली. शरद पवारांनीही पत्रकार परिषद घेत निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं. अन् अखेर भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
आज पुन्हा एकदा मनसेच्या वतीने देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिण्यात आलं आहे. यात एसटी कर्मचाऱ्यांसदर्भात महत्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे.