मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 14 वा वर्धापन दिन सोहळा आज (9 मार्च) नवी मुंबईत पार (MNS Shadow Cabinet by Raj Thackeray) पडला. या कार्यक्रमात मनसे नेते अनिल शिदोरे यांनी शॅडो कॅबिनेटमधील मंत्र्यांची घोषणा केली. मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्यावरही जबाबदारी देण्यात आली आहे. यात अमित ठाकरे यांना मराठी भाषा, पर्यटन, ग्रामविकास, वने आणि आपत्ती व्यवस्थापन या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
मनसेच्या वरच्या (MNS Shadow Cabinet by Raj Thackeray) फळीतील नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, शालिनी ठाकरे यांची वर्णी ‘शॅडो कॅबिनेट’मध्ये लागली आहे. याशिवाय संजय शिरोडकर, शिरीष सावंत, रिटा गुप्ता यांचाही मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे.
मनसे शॅडो कॅबिनेटची संपूर्ण यादी : MNS Shadow Cabinet
- गृह विधी व न्याय, जलसंपदा आणि सामान्य विभाग – बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजीव उबंरकर, प्रवीण कदम, योगेश खैरे, प्रसाद सरफरे, दिपक शर्मा,
- जलसंपदा आणि लाभक्षेत्र – अनिल शिदोरे
- मराठी भाषा – अमित ठाकरे, अनिल चौपडे
- वित्त आणि गृहनिर्माण – नितीन सरदेसाई,
- महसूल – अनिल अभ्यंकर, दिलीप कदम, संदीप पाचंगे,
- उर्जा – शिरीष सावंत, मंदार हळबे, सागर देवरे, विनय भोईटे,
- ग्रामविकास – जयप्रकाश बावीस्कर, अमित ठाकरे, अनिल शिदोरे, प्रकाश भोईर
- वने, आपत्ती व्यवस्थापन – संजय चित्रे, अमित ठाकरे, संतोष धुरी, आदित्य दामले, वागिष सारस्वत, ललित यावलकर
- शालेय शिक्षण, उच्चशिक्षण, वैद्यकीय शिक्षण – अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर – उच्चशिक्षण, सुधाकर तांबोळी, अमोल रोगे, अभिजीत पानसे, चेतन पेडणेकर
- कामगार – राजेंद्र वागस्कर, गजानन राणे, सुरेंद्र सुर्वे
- नगरविकास आणि पर्यटन– संदिप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुणकर, किर्ती शिंदे, हेमंत कदम, संदिप कुलकर्णी, फारूक डाळा, योगेश चिले,
- सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण – रिटा गुप्ता, कुंदा राणे
- सहकार आणि पणन – दिलीप धोत्रे, कौस्तुभ लिमये, वल्लभ चितळे
- अन्न व नागरी पुरवठा – राजा चौगुले, विशाल पिंगळे, महेश जाधव
- मत्स्यविकास आणि बंदरे – परशुराम ऊपरकर, निशांत गायकवाड
- महिला व बालविकास – शालिनी ठाकरे
- सार्वजनिक बांधकाम – सीमाताई शिवलकर,संजय शिरोडकर
- रोजगार हमी आणि फलोत्पादन – बाळा शेडगे, आशिष पुरी
- सांस्कृतिक कार्य – अमेय खोपकर
- कृषी व दुग्धविकास – संजीव पाखरे, अजय कदम
- कौशल्य विकास – स्नेहल जाधव
- सामाजिक न्याय – संतोष सावंत, गजानन काळे
- ग्राहक सरंक्षण – प्रमोद पाटील
- आदिवासी विकास – आनंद एमबडवाड, किशोर जाचक, परेश चौधरी
- पर्यावरण – रुपाली पाटील, किर्तीकुमार शिंदे, देवव्रत पाचिल
- खारजमीन भुकंप पुनर्वसन – अमिता माझगावकर
- क्रीडा व युवककल्याण – विठ्ठल लोकणकर
- अल्पसंख्यांक – अल्ताफ खान, जावेद तडवी
दरम्यान, मनसेच्या शॅडो कॅबिनेटमधील सहकाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विशेष सूचना दिल्याची माहिती आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत रविवारी झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी सहकाऱ्यांना सूचना दिल्या. (MNS Shadow Cabinet by Raj Thackeray)
Raj Thackeray | लोकांना आमच्याकडून अपेक्षा, मात्र मतदान आम्हाला नाही : राज ठाकरे
राज ठाकरेंच्या सूचना काय आहेत?
1. कुणीही आपली स्वतःची व्हिजिटिंग कार्ड छापू नयेत.
2. आपल्या दिलेल्या खात्याचा तसेच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर होणाऱ्या निर्णयांचा सखोल अभ्यास करावा.
3. कुणीही स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन त्यावर भूमिका मांडू नये.
4. आपल्याला दिलेल्या पदाचा गैरवापर करु नये.
5. शॅडो मंत्र्यांनी ब्लॅकमेलिंग करु नये, तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.