MNS Raj Thackeray candidates list : आगामी विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच बैठकांचे सत्र सुरु केले आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेत आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं वक्तव्य केले. त्यानंतर आता सध्या राज ठाकरेंकडून या जागांसाठी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. आता त्यातच 16 संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.
मुंबईतील 36 विधानसभा जागांवरील 16 संभाव्य उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या सूत्रांनी दिली आहे. यात मुंबईतील 36 विधानसभा जागेवर मनसेचे 16 संभाव्य उमेदवार ठरले असल्याचे बोललं जात आहे. यात शिवडी विधानसभेतून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच माहिम विधानसभा मतदारसंघातून नितीन सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे बोललं जात आहे.
तसेच मनसेचे कोकणातील नेते वैभव खेडेकर यांना खेड-दापोली-मंडणगड विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या राज ठाकरे हे विधानसभेच्या विविध मतदारसंघाची चाचपणी करत आहेत. यंदा विधानसभेला कोणाला आणि कशाप्रकारे तिकीट वाटप होईल, याचे निकष राज ठाकरेंनी सांगितले होते. आता यातील 35 जागांवर संभाव्य उमेदवार निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
1) शिवडी – बाळा नांदगावकर
2) भायखळा – संजय नाईक
3) वरळी – संदीप देशपांडे
4) माहीम – नितीन सरदेसाई
5) चेंबूर – माऊली थोरवे
6) घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल
7) विक्रोळी – विश्वजित ढोलम
8) मुलुंड – सत्यवान दळवी/राजेश चव्हाण
9) भांडुप – शिरीष सावंत/योगेश सावंत/संदीप जळगावकर/अतिषा माजगावकर
10) कलिना – संदीप हटगी/संजय तुरडे
11) चांदिवली – महेंद्र भानुशाली
12) जोगेश्वरी – शालिनी ठाकरे
13) दिंडोशी – भास्कर परब
14) गोरेगाव – वीरेंद्र जाधव
15) वर्सोवा – संदेश देसाई
16) मागाठणे – नयन कदम
मुंबईसह कोकणातून खेड-दापोली-मंडणगड विधानसभा जागेसाठी वैभव खेडेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे. तसेच भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शैलेश बिडवे यांना उमेदवारी दिली जाईल, असे म्हटलं जात आहे. तर नवी मुंबई विधानसभा मतदारसंघातून गजानन काळे आणि पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून साईनाथ बाबर यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.