नाशिक : राज्यात सत्तास्थापनेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये जाणार (Raj thackeray nashik visit) आहेत. सलग तीन दिवस राज ठाकरेंचा हा दौरा असणार आहे. येत्या 8, 9, 10 डिसेंबरला राज ठाकरे नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती समोर येत (Raj thackeray nashik visit) आहे. यावेळी राज ठाकरे नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकही करणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे राज ठाकरे या बैठकीत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं (Raj thackeray nashik visit) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 8, 9 आणि 10 डिसेंबरला असे तीन दिवस राज ठाकरेंचा नाशिक दौरा असणार आहे. यावेळी नाशिकमधील आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा हा पहिलाच दौरा असल्यानं मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला समजला जातो. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकासआघाडीने एकत्र सत्ता स्थापन केल्यानंतर नाशिकमध्येही महापौर निवडणुकीत नवी समीकरणं पाहायला मिळाली. नाशिकमध्ये महापौर निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र आली. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र येऊनही महापौरपद आपल्याकडे राखण्यात भाजपला यश (Raj thackeray nashik visit) आलं होतं.
महत्त्वाचं म्हणजे नाशिक महापौर निवडणुकीत मनसेने भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश नगरसेवकांना दिले होते. मनसेने आपल्या 5 नगरसेवकांना व्हीप बजावला होता.
महापौर निवडणुकीत भाजपचे महापौरपदाचे उमेदवार सतीश कुलकर्णी आणि उपमहापौरपदाचे उमेदवार भिकूबाई बागुल यांनाच मतदान करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा व्हीप मनसेने आपल्या नगरसेवकांना बजावला होता.
भाजप आणि मनसेच्या या जवळीकीमुळे राज्यात नवं समीकरण पाहायला मिळत आहे. हेच समीकरण आता नाशिक महापालिकेनंतर राज्याच्या राजकारणात पाहायला मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार (Raj thackeray nashik visit) आहे.