मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आलं (Raj thackeray shoes Orange laces) आहे. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी तीन वाजता सहभागी झाले. या मोर्चात राज ठाकरेंचा यांचा भगवा रंगातील नवा लूक समोर आला.
राज ठाकरे यांनी या मोर्चासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. तर डोक्यावर भगव्या रंगाचा टिळा लावला होता. त्याशिवाय मनसेच्या नवा झेंडा असलेला बॅच उजव्या हाताला बांधला होता. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी पांढऱ्या आणि करड्या रंगाचे शूज घातले होते. मात्र या शूजच्या लेसचा रंगही भगवा होता.
गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर मनसेचा मोर्चा निघणार आहे. ठाणे, पालघर, पुणे, नाशिकसह राज्यभरातील मनसैनिक मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. भव्य स्टेज उभारण्यात आला असून दोन लाख जणांसाठी आसनव्यवस्था असल्याचाही दावा केला जात (Raj thackeray shoes Orange laces) आहे.
मनसे नेते अमित ठाकरे यांनीही पांढरे शर्ट आणि दंडाला भगवा बॅच लावलेला आहे. तर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी भगवा रंगांचा कुर्ता परिधान केला आहे.
या मोर्चामध्ये राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने मनसैनिक सहभागी झाले आहे. या मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक मनसैनिकाच्या हातात मनसेचा नवा झेंडा आणि डोक्यावर भगव्या रंगाची टोपी पाहायला मिळत आहे.
आझाद मैदानात उभारलेल्या भव्य स्टेजवर आधी मनसे नेत्यांची भाषणं होतील. अखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होईल. हा मोर्चा का काढण्यात आला आहे, याचा उद्देश काय, हे राज ठाकरे आपल्या भाषणातून जाहीर करतील. यानंतर मोर्चाची सांगता (Raj thackeray shoes Orange laces) होईल.