मुंबई : असं म्हणलं जाते की, (Sharad Pawar) शरद पावर बोलतात त्याच्या विरुध्द करतात. अनेक वेळा शरद पवार कुणावर खुश झाले तर पुढे त्याचा कार्यक्रमच होतो. आता (Sanjay Raut) संजय राऊतांवर ईडी कडून कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी कारवाईचा निर्णय घेताच मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा हे संजय राऊतांवर ईडी च्या कारवाईवरुन (PM Narendra Modi) पंतप्रधान मोदी यांना भेटले होते. आता त्यांच्या भेटीनंतरच ही कारवाई झाल्याचे सांगत हीच खरी पवारनिती असल्याचे काळे यांनी ट्विट केले आहे. राऊतांवरील कारवाईनंतर शिवसैनिक हे रस्त्यावर उतरले आहेत तर मनसेच्या गोठातून अशाप्रकारे खिल्ली उडवली जात आहे. काळे यांच्या एका ट्विटने शरद पवार आणि संजय राऊत या दोघांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पत्राचाळीतील जागेच्या व्यवहारावरुन सकाळी 9 वाजल्यापासून संजय राऊत व त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. यासाठी 10 अधिकारी हे राऊतांच्या घरी दाखल झाले होते. या चौकशीनंतर राऊतांना ते बरोबर घेऊन जाणार असल्याने शिवसैनिकांनी एकच गोंधळ केला आहे. राऊतांना घराबाहेर नेऊ दिले जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मैत्री ह्या त्यांच्या बंगल्यासमोरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कडकोट सुरक्षेत राऊतांना घेऊन जाण्यासाठी ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत.
विश्वप्रवक्ते यांच्यासाठी आदरणीय पवारसाहेब पंतप्रधान मोदींना भेटले होते …
त्याचा नेमका उलटा परिणाम होताना दिसतोय ….
यालाच बहुदा पवारनिती असं म्हणतात …
नवाब सेनेच्या गोटात सन्नाटा …— Gajanan Kale (@GajananKaleMNS) July 31, 2022
संजय राऊत हे विश्वप्रवक्ते असून त्यांना ज्यावेळी ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. यावेळी केंद्रीय यंत्रणाचा वापर वाढत असून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई केल्या जात आहेत. त्यावेळी संजय राऊतांसाठी शरद पवार हे भेटले अशी चर्चा रंगली होती पण पवार यांच्या भेटीचा नेमका उलटा परिणाम झाला असून यालाच बहुतेक पवारनिती असे म्हणतात अशा आशयाचे ट्विट काळे यांनी केले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर तपास यंत्रणांनी धाडी मारल्या होत्या. ईडीचं हे धाडसत्रं सुरू असल्याने आघाडीतील अनेक नेते अस्वस्थ असून सूड भावनेने ही कारवाई केली जात असल्याचा त्यांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी मोदींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असल्याचा कयास आहे.