मुंबई : अभिनेता सोनू सूदने परप्रांतीयांना घरी जाण्यास मदत केल्याच्या कामगिरीवर सामनातून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. यानंतर राजकीय वातावरण चांगले तापले होते. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला. “जर आपण कोरोना रुग्णांना दिलासा देण्याचे काम केलात, तर मी स्वत: सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे,” असे संदीप देशपांडे म्हणाले. (Sandeep Deshpande on Sanjay Raut criticism in Saamana Rokhthok)
“राऊतसाहेब सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. एकतर आपल्या टेस्ट होत नाही. टेस्ट झाल्या तर रुग्णवाहिका मिळत नाही. रुग्णवाहिका मिळाली तर सरकारी रुग्णालयात जागा मिळत नाही. सरकारी रुग्णालयात जागा मिळाली नाही आणि जागा मिळाली तर सरकारी रुग्णालयांची परिस्थिती वाईट आहे.
प्रायव्हेट वाले वाटेल ते बील आकारत आहे, अशी सध्या रुग्णांची अवस्था आहे. मला असं वाटतं आपण ही रुग्णांची अवस्था सुधारली तर आपणही सोनू सूदसारखे प्रसिद्ध होऊ शकता.
सर्वात महत्त्वाचे जर आपणही या रुग्णांना दिलासा देण्याचे काम जर केलं, तर मी स्वत: सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे,” असे संदीप देशपांडे यांनी व्हिडीओत म्हटलं. (Sandeep Deshpande on Sanjay Raut criticism in Saamana Rokhthok)
तर नक्कीच सामना वर येऊन पाया पडीन pic.twitter.com/WPdAGXEQFR
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 8, 2020
हेही वाचा : सोनू सूदवर ‘सामना’तील टीकेला भाजप-मनसेतून उत्तर, निरुपम यांच्याही कानपिचक्या
नेमकं प्रकरण काय?
अभिनेता सोनू सूदने परप्रांतीयांना आपापल्या घरी जाण्यास मदत केल्याच्या कामगिरीवर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यावरुन भाजप-मनसेसह काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही टीकेचे बाण सोडले होते. यानंतर सोनू सूद काल (रविवार 7 जून) रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास ‘मातोश्री’वर गेला होता. काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासोबत सोनूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास पाऊण तास त्यांची चर्चा झाली.
या भेटीचा फोटो ट्विट करत “एका चांगल्या व्यक्तीला भेटलो” अशा आशयाचे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले. तर संजय राऊत यांनी अखेर सोनू सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला..मातोश्रीवर पोहोचले, असे ट्विट करत त्यांना टोला लगावला.
रोखठोकमध्ये नेमकं काय म्हटलं?
“एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय ? “कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरसह एक मेसेज करा. सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल” असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काम करत नाही. पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला.” अशी टीका ‘सामना’तून झाली. (Sandeep Deshpande on Sanjay Raut criticism in Saamana Rokhthok)
This evening @SonuSood met up with @CMOMaharashtra Uddhav Thackeray ji along with Minister @AslamShaikh_MLA ji and me. Better Together, Stronger Together to assist as many people through as many people. Good to have met a good soul to work for the people together. pic.twitter.com/NrSPJnoTQ6
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 7, 2020
संबंधित बातम्या :
हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही, खांद्याला खांदा लावून काम करा : गिरीश महाजन