संजय राऊतांना स्वातंत्र्य युद्धासाठी आत टाकलं होतं की काय? तो तर 1 नंबरचा आत्मकेंद्री माणूस?.. जहरी टीका कुणाची?

| Updated on: Nov 10, 2022 | 12:10 PM

शिवसेना खासदार संजय राऊत यांची काल जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर राज्यभऱात शिवसेनेने तीन दिवसांची दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.

संजय राऊतांना स्वातंत्र्य युद्धासाठी आत टाकलं होतं की काय? तो तर 1 नंबरचा आत्मकेंद्री माणूस?.. जहरी टीका कुणाची?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांचं स्वागत झालं. मुंबई आणि राज्यभरात जो काही उत्साह होता. त्यावरून मला वाटलं की त्यांना स्वातंत्र्य युद्धात आत टाकलं होतं की काय… त्यांना तर घोटाळ्या प्रकरणी जेलमध्ये (Jail) टाकलं होतं. संजय राऊत एक नंबरचा स्वार्थी आणि आत्मकेंद्रीत माणूस आहे… आता जेलमध्ये जाऊन आल्यानंतर त्याने स्वार्थीपणा करू नये, अशी जळजळीत टीका मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केली आहे.

यापूर्वी संजय राऊत यांची वक्तव्ये काढून पहावीत. त्यांनी लोकांच्या मनात न्यायपालिकेबद्दल संशय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आणि आता म्हणतायत की, न्याय पालिकेवर विश्वास आहे.. असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलंय.

राऊतांच्या स्वागतावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले, ‘ काल शिवसेनावाले म्हणत होते टायगर इझ बॅक मग मातोश्रीमध्ये कोण राहतो पेंग्वीन? स्वतच स्वतःला तुम्ही वाघ म्हणता, लोकांनी म्हंटलं पाहिजे ना..

प्रतापपडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीभोवतीचं बांधकाम आज पाडण्यात आलं. यावरून प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले, ‘ मला सांगा अफजलखान कोण आहे?
जर अफजल खानाला पाठिंबा देणारे लोकं असतील ते देशद्रोही आहेत. जे लोकं यावर आक्षेप घेत असतील त्यांना राष्ट्रवादीवाल्यांना जास्त पुळका आहे अफझलखानाचा.. हे आव्हाड आणि त्यांचे चिल्ले पिल्ले आणि आता शिवसेना पण त्यात आली आहे..

याकूब मेननची कबर आहे त्याच्यावरच सुद्धा जे बांधकाम आहे. ते उखडून फेकलंच पाहिजे. इतिहास आहे तो आहेच तो बदलू शकत नाही, असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं.

दरम्यान, संजय राऊत यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून जल्लोष करण्यात येत आहे. आज बुधवारी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. जेलमधल्या दिवसांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. जेल कोणतंही असो, तिथं राहणं कठीण असतं. जेलच्या मोठ्या भिंतींशी बोलावं लागतं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

तसेच लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं.