लॉकडाऊन हवे की नको? राज्य सरकारकडून मदत मिळाली का? मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल जाहीर

| Updated on: Aug 25, 2020 | 11:36 AM

54 हजार 177 नागरिकांनी मनसेच्या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर आपली मते नोंदवली.

लॉकडाऊन हवे की नको? राज्य सरकारकडून मदत मिळाली का? मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल जाहीर
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर सर्वेक्षण घेतले होते. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केलेल्या सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला आहे. (MNS Sandeep Deshpande released the result of online survey on Lockdown)

मनसेने समाजमाध्यमांवरुन विविध मुद्द्यांवर सात दिवसात नागरिकांचा कौल जाणून घेतला. 54 हजार 177 नागरिकांनी या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर आपली मते नोंदवली. याचा कौल आज जाहीर करण्यात आला आहे.

काय आहे सर्वेक्षणाचा कौल?

1. लॉकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आणला पाहिजे का?

होय – 70.3 टक्के
नाही – 26 टक्के
माहिती नाही – 3.7 टक्के

2. लॉकडाऊनचा तुमच्या नोकरी/उद्योगधंद्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे का?

होय – 89.8 टक्के
नाही – 8.7 टक्के
माहिती नाही – 1.5 टक्के

3. लॉकडाऊनच्या काळात आपल्या बुडालेल्या नोकरी/उद्योगधंद्यासाठी राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली आहे का?

होय – 8.7 टक्के
नाही – 84.9 टक्के
माहिती नाही – 6.4 टक्के

4. राज्य सरकारने तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे का?

होय – 32.7 टक्के
नाही – 52.4 टक्के
माहिती नाही – 14.9 टक्के

5. शालेय शुल्काबाबत सरकारी धोरणांची अंमलबजावणी होत आहे का?

होय – 10.3 टक्के
नाही – 74.3 टक्के
माहिती नाही – 15.4 टक्के

6. लोकल रेल्वेसेवा आणि एसटी सेवा पूर्ववत सुरु झाली पाहिजे का?

होय – 76.5 टक्के
नाही – 19.4 टक्के
माहिती नाही – 4.1 टक्के

7. लॉकडाऊनच्या काळातील वीज देयकाबद्दल आपण समाधानी आहात का?

होय – 8.3 टक्के
नाही – 90.2 टक्के
माहिती नाही – 1.5 टक्के

8. लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला वैद्यकीय मदत वेळेत आणि योग्य मिळाली आहे का?

होय – 25.9 टक्के
नाही – 60.7 टक्के
माहिती नाही – 13.4 टक्के

9. या संपूर्ण काळात मुख्यमंत्र्यांनी घरातच बसून केलेल्या कामकाजाबद्दल आपण समाधानी आहात का?

होय – 28.4 टक्के
नाही – 63.6 टक्के
माहिती नाही – 8 टक्के

 

संबंधित बातम्या :

‘पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का?’ मनसेचा मुंबईच्या महापौरांवर निशाणा

(MNS Sandeep Deshpande released the result of online survey on Lockdown)