औरंगाबाद: राज ठाकरे यांनी मनसेला संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठवाड्यात कामाला लागली आहे. राज्यात 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. मराठवाड्यात जवळपास 4134 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्या सर्वच निवडणुका लढवणार असल्याची माहिती मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिलीय. (MNS to contest Gram Panchayat Election in Marathwada)
शहरी पक्ष अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या निवडणुकांद्वारे ग्रामीण स्तरावर पोहोचण्याचा प्रयत्न आहे. गाव पातळीर पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मनसेला ग्रामीण भागातील एन्ट्रीचा फायदा होणार की त्यांच्या एन्ट्रीमुळे नेमका कुणाचा फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार, हे 18 जानेवारीला समजेल.(MNS to contest Gram Panchayat Election in Marathwada)
राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त मनसेकडे असणारे सुशिक्षित तरुण या मनसेच्या पॅनेलकडून निवडून येतील आणि गावाचा विकास करतील, असं सुमित खांबेकर यांनी सांगितले. (MNS to contest Gram Panchayat Election in Marathwada)
मराठवाडयात औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, जालना, लातूर, हिंगोली या आठ जिल्ह्यात 4134 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.
औरंगाबाद: 618
बीड : 129
नांदेड : 1015
उस्मानाबाद : 428
परभणी :566
जालना :475
लातूर :408
हिंगोली: 495
विदर्भातही मनसे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरणार
भाजपचा गड असलेल्या नागपूर जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. गाव पातळीवरुन संघटन मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे विदर्भातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
भाजपच्या गडात मनसेची ताकद, ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसैनिक आक्रमक
भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात 130 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. या सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार नागपूर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. गाव पातळीवरील संघटन मजबूत करण्यासाठी मनसे सध्या आक्रमक झाली आहे. मनसेच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचं मनेचे नेते हेमंत गडकरी यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर#grampanchayatelection #ElectionCommission https://t.co/WFbyLCT6UE
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
संबंधित बातम्या:
सरपंचांची सोडत निवडणुकीनंतर, आधीची सोडत रद्द
तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर
(MNS to contest Gram Panchayat Election in Marathwada)