मुंबई : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे. शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेसह अनेक पक्षांचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिंदे गटात सामील होत आहेत. अशातच राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेने शिंदे गटावर अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे.
शिंदे गटाकडून मनसेचे कार्यकर्ते फोडण्यात येत असल्याचा आरोप झाला आहे. मनसे सरचिटणीस संजय नाईक यांनी हा गंभीर आरोप केला आहे. संजय नाईक हे मनसेचे मुंबईतील भायखळा परिसरातील पदाधिकारी आहेत.
शिंदे गटात येण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांना विविध आमिषे दाखवण्यात येत असल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना कार्यालयामध्ये बोलावून आमच्या पक्षांमध्ये या तुम्हाला चांगलं पद देतो अशा वेगवेगळी अमिष दाखवली जाते असल्याचे नाईक म्हणाले.
नाईक यांच्या या आरोपांमुळे शिंदे गटाला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यानच्या काळात मनसे प्रमुख हे राज ठाकरे यांना भेटायला गेले होते. तसेच दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट राज ठाकरेंना निमंत्रण देणार असल्याचीही चर्चा रंगली होती.
या भेटीगाठीमुळे मनसे शिंदे गटासह जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचेही संजय नाईक यांनी स्पष्ट केले आहे.