सांगली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक ही स्वबळावर लढवली जाईल, असे वक्तव्य बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी केले आहे. या निवडणुकीत मनसे (MNS) ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत असेल. आगामी काळात हिंदुत्व हा मनसेचा प्रमुख अजेंडा असेल. मात्र, आम्ही परप्रांतीयांचा मुद्दा सोडणारही नाही, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले. (MNS will contest BMC election in Mumbai without any alliance says bala nandgaonkar)
शिवसेना आणि भाजप यांच्यातील लढाईमुळे मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक प्रचंड चुरशीची ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी वेळ आल्यावर मुंबई महानगरपालिकेत मनसेशी युती करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजप आणि मनसे युती करणार, अशा चर्चांनी जोर धरला होता.
मात्र, बाळा नांदगावकर यांनी भाजपसोबत युती करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. ते मंगळवारी सांगलीतील पदवीधर निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत असू, असे त्यांनी स्पष्ट केले. आता मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतला असला तरी आम्ही कायम महाराष्ट्रातील भूमिपूत्रांसोबत राहू, असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार यांनाही ईडीची नोटीस आली होती. राज ठाकरे तेव्हा ‘ईडी’च्या चौकशीलाही सामोरे गेले. मग आता शिवसेनेच्या नेत्यांनीही चौकशीला सामोरे जावे. सुडाचे राजकारण जरी असले तरी प्रताप सरनाईकांनी चौकशीला सामोरे जावे, असा सल्ला बाळा नांदगावकर यांनी दिला.
महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारासंघाचे उमेदवार हे आजोबा आहेत. कारण त्यांचे वय 75 वर्ष आहे. तर भाजपचे उमेदवार म्हणजे बुडीत कारखानदार आहेत. कारण त्यांनी अनेक शेतकऱ्यांचे पैसे बुडविले आहेत. ज्यांना पदवीधरांचे ज्ञान नाही, अशा नेत्यांनी या लोकांना उमेदवारी देणे म्हणजे पदवीधरांचा अपमान आहे”, असा घणाघात पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांनी केला.
संबंधित बातम्या:
सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, मनसेसोबत जाणार नाही : देवेंद्र फडणवीस
‘शिवसेनेचं लग्न एकाशी, लफडं दुसऱ्याबरोबर’, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा शिवसेनेवर हल्लाबोल
(MNS will contest BMC election in Mumbai without any alliance says bala nandgaonkar)