जालना: निवडणुकीदरम्यान मतदारांवर कोणताही दबाव असू नये किंवा कोणतंही प्रलोभन असू नये यासाठी निवडणूक आयोग आदर्श आचार संहिता (Model Code of Conduct Violation) लागू करतं. मात्र, या आचारसंहितेला राजकीय नेत्यांकडून कायमच केराची टोपली (Model Code of Conduct Violation) दाखवली जात असल्याची प्रकरणं समोर येतात. भाजपचे परतूर मतदारसंघाचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनीही (Babanrao Lonikar bribe Voters) असंच केल्याचं उघड झालं आहे. मी सगळ्या तांड्यात पैसे दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत मला अजिबात भीती वाटत नाही, असं वक्तव्य लोणीकर यांनी केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ (Babanrao Lonikar bribe Voters) चांगलाच व्हायरल होत आहे.
बबनराव लोणीकर म्हणाले, “सगळ्या तांड्यांमध्ये मी पैसे दिले आहेत. म्हणून मला या निवडणुकीत काहीही भीती वाटत नाही. आपण सगळे माझ्या सोबत आहेत. आपल्या सर्वांचा आशिर्वाद माझ्यासोबत आहे. आपण सर्वांनी रॅलीत यायचं आहे. मोदींच्या सभेला जायचं आहे.”
VIDEO: मी सगळ्या तांड्यात पैसे दिले, म्हणून निवडणुकीत अजिबात भीती नाही : बबनराव लोणीकर pic.twitter.com/OSFozZgTzO
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2019
बबनराव लोणीकर यांचा पैसे दिल्याचं वक्तव्य करणारा व्हिडीओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच पैसे देऊन नागरिकांची मतं विकत घेणाऱ्या लोणीकरांवर निवडणूक आयोग काय कारवाई करणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच अशा कृत्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर हे प्रकार असेच वाढत जातील, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.
राज्याची विधानसभेसोबत मागील काळात लोकसभा निवडणुकीतही आचारसंहिता भंगाची अनेक प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर अनेकांना नोटीसही देण्यात आल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाचे माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या काळात ज्या धडक कारवाई झाल्या, तशा सध्या होताना दिसत नाही, अशीही तक्रार राजकीय जाणकार सांगतात. निवडणूक आयोगाचा धाक तयार होण्यासाठी आणि या आचारसंहिता भंगावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे लोणीकरांच्या प्रकरणात निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.