भाजपच्या 230 जागा आल्या तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत : सुब्रमण्यम स्वामी

| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं वक्तव्य केलंय. भाजपच्या 230 जागा आल्या तरीही नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असा दावा त्यांनी केलाय. हफिंगटन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पर्यायावरही स्वामींनी वक्तव्य केलं. गडकरींचं नाव पुढे आलं तर हा पर्याय चांगला असेल, कारण […]

भाजपच्या 230 जागा आल्या तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत : सुब्रमण्यम स्वामी
Follow us on

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं वक्तव्य केलंय. भाजपच्या 230 जागा आल्या तरीही नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असा दावा त्यांनी केलाय. हफिंगटन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पर्यायावरही स्वामींनी वक्तव्य केलं. गडकरींचं नाव पुढे आलं तर हा पर्याय चांगला असेल, कारण गडकरी देखील मोदींसारखेच चांगले व्यक्ती आहेत, असं ते म्हणाले.

भाजपला किती जागा मिळू शकतात, असा प्रश्न स्वामींना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “हे सांगणं अत्यंत कठीण आहे, पण मला वाटतं की पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येण्याची शक्यता जास्त आहे. समजा भाजपला 230 ते 220 जागा मिळाल्या आणि इतर मित्रपक्षांना 30 जागा मिळाल्या तर एकूण आकडा 250 पर्यंत जाईल. सरकार बनवण्यासाठी आम्हाला अजून 30 जागांची गरज असेल.”

मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का याबाबतही स्वामींना विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले, “बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इतर 30-40 जागांचा पाठिंबा देणाऱ्या पक्षांवर हे अवलंबून आहे. जर मित्रपक्षांनी सांगितलं की आम्हाला नरेंद्र मोदी नकोत, तर शक्य होणार नाही. मोदी पुन्हा पंतप्रधान नकोत असं ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अगोदरच सांगितलंय. मायावतींना आम्ही सोबत घेतलं तरी त्यांनी अजून मोदींबाबतची भूमिका जाहीर केलेली नाही.”

मोदींच्या जागी गडकरींच्या नावाचीही चर्चा आहे. यावर स्वामी म्हणाले, असं झालं तर चांगलंच आहे. गडकरी मोदींप्रमाणेच योग्य व्यक्ती आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भाजपला बालाकोट हल्ल्याचा मोठा फायदा झाला. पुलवामा हल्ल्यानंतर भाजपने एअर स्ट्राईक केला नसता तर भाजपला 160 जागात आवरावं लागलं असतं, असं ते म्हणाले.