नवी दिल्ली : नरेंद्र मोदींनी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. देशभरात भाजप आणि एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर अनेक जणांना वगळण्यात आलंय. रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनाही राज्यमंत्री पद देण्यात आलंय.
या मंत्र्यांचा शपधविधी :
शिवसेनेकडून अरविंद सावंत यांना मंत्रिपद
शिवसेनेला मोदींच्या मंत्रिमंडळात किती मंत्रिपदं मिळणार याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र आज अरविंद सावंत हे शिवसेनेकडून मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.
स्मृती इराणींना कोणतं मंत्रिपद?
अमेठीमधून राहुल गांधींचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी यांनाही मंत्रिमंडळात महत्त्वाचं स्थान मिळू शकतं. कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद यांच्याकडेही महत्त्वाच्या खात्याचा भार दिला जाऊ शकतो.
नितीन गडकरी यांच्याकडे अनेक खात्यांचा कारभार आहे. त्यांचं कामही उत्तम सुरु आहे. त्यामुळे ते आपलं सुरु असलेलं कामच पुढे नेतील. अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनाही यंदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मोदींच्या टीममधील ते एक महत्त्वाचा मुस्लिम चेहरा आहेत.
याशिवाय धर्मेंद प्रधान, प्रकाश जावडेकर, जगत प्रकाश नड्डा यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
आधीच्या मंत्रिमंडळातील हरदीप पुरी, के.जे.अल्फोन्सो आणि मनोज सिन्हा यांचा पराभव झाल्यानं त्यांना डच्चू दिला जाऊ शकतो.
यांना मिळणार डच्चू
महाराष्ट्राला मंत्रिपदं
केंद्रातील एवढ्या दमदार विजयानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुका नव्या विजयाचं आव्हान घेऊन येतात. यंदा महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे केंद्रिय मंत्रिमंडळात या राज्यांना नक्की स्थान देण्यात येईल.