मोदी-शाहांनी दादागिरीच केली, मग ममतांनी दादागिरी केली तर बिघडलं कुठे? : राज ठाकरे

| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज दादरमधील आंबा महोत्सवाचं उद्घाटन झालं. शिवाजी पार्क येथील वनिता समाज इथे हा आंबा महोत्सव भरवण्यात आला आहे. अभिनेते संजय मोने आणि सुकन्या मोने यांनी आयोजित केलेल्या आम्र महोत्सवाचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्धाटन झालं. यावेळी राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, “मोदींच्या कालच्या […]

मोदी-शाहांनी दादागिरीच केली, मग ममतांनी दादागिरी केली तर बिघडलं कुठे? : राज ठाकरे
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज दादरमधील आंबा महोत्सवाचं उद्घाटन झालं. शिवाजी पार्क येथील वनिता समाज इथे हा आंबा महोत्सव भरवण्यात आला आहे. अभिनेते संजय मोने आणि सुकन्या मोने यांनी आयोजित केलेल्या आम्र महोत्सवाचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्धाटन झालं. यावेळी राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, “मोदींच्या कालच्या पत्रकार परिषदेबद्दल न बोललेलं बरं. कारण तेच (मोदी) काहीच बोलले नाहीत, तर मग आपण काय बोलायचं”

5 वर्षात तुम्ही पत्रकांसमोर कधीच आले नाहीत. पंतप्रधान पत्रकारांना इतकं का घाबरतात, याचं उत्तर त्यांनी स्वत:च द्यावं. असं त्यांनी काय केलंय ज्यामुळे ते एवढं पत्रकारांपासून पळत आहेत, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे करत आहेत ते योग्यच आहे. आजवर या दोघांनी (मोदी-अमित शाह) दादागिरीच केली आहे. मग ममतांनी केली तर बिघडलं कुठे? अमित शाहांना कळू दे दादागिरी काय असते ते. कोलकात्यातील रॅली अर्धी सोडून पळून आले. यांच्या बाबतीत हेच पाहिजे होतं, असं राज ठाकरे म्हणाले.

अमित शाहांच्या रॅलीत हिंसाचार

दरम्यान, चार दिवसांपूर्वी कोलकात्यात अमित शाहांच्या रॅलीत हिंसाचार झाला होता. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. दगडफेक आणि जाळपोळीमुळे कोलकाता धगधगत होतं. तृणमूलने हा हल्ला केल्याचा आरोप अमित शाह यांचा आहे. तर भाजप कार्यकर्त्यांनीच हा राडा घातल्याचा दावा ममता बॅनर्जींनी केला.

मोदी-शाहांची पत्रकार परिषद

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षातील पहिली पत्रकार परिषद शुक्रवारी 17 मे रोजी घेतली. या पत्रकार परिषदेला अमित शाहही उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत मोदींनी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. सर्व प्रश्नांना अमित शाहांनीच उत्तरं दिली. मोदींनी आपलं म्हणणं मांडून केवल पत्रकार परिषदेला हजेरी लावली.

संबंधित बातम्या 

पंतप्रधान मोदींची पहिली पत्रकार परिषद, सर्व प्रश्नांना अमित शाहांची उत्तरं  

तुमचं नशीब चांगलंय की मी शांत बसलीय, नाहीतर…, ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा  

आंध्र 0, तामिळनाडू 0, महाराष्ट्र 20, भाजपसाठी ममतांचा एक्झिट पोल  

भाजप-तृणमूलच्या वादात ज्यांचा पुतळा फोडला, ते ‘ईश्वरचंद्र विद्यासागर’ कोण होते?  

कोलकात्यात अमित शाहांच्या रोड शोमध्ये हिंसाचार