मुंबई : राष्ट्रवादीच्या (NCP) संवाद दौऱ्या दरम्यान जळगावात (Jalgaon) असताना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मला बोलावलं त्यामुळे मी जळगावात गेलो असल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितले. मोहित कंबोज हे कोणाच्या इशाऱ्याने काम करता हे सर्वांना माहीत आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये मोहित कंबोजांना आरोप करण्यासाठीचं ठेवले आहे. मोहित कंबोजचा महाराष्ट्रामध्ये दुरवर संबंध नाही. ते ज्यांच्यावर आरोप करतात ते त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहेत. त्यामुळे विविध कंबोजला फारसं महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही अशी टीका मिटकरी यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांना संभाजी महाराजांचा इतिहास चांगल्या प्रकारे माहिती आहे. कोणाची बुद्धी विपरीत आहे आणि कोणाचा विनाश आहे आगामी काळात कळेल असा टोला अमोल मिटकरी यांनी फडणवीसांना लगावला. प्रादेशिक पक्ष वाचवायला पुरोगामी संघटनेने काही पाऊले उचलली आहेत, त्यामुळे त्यांचं स्वागत करावं लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा या देशाची विचारधारा असू शकत नाही. त्यामुळे भाजपच्या गटात अस्वस्थता वाढली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीवर देवेंद्र फडणवीस यांनी विनाशकाली विपरीत बुद्धी असं म्हटले होते. त्यावर अमोल मिटकरी यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्रात पालकमंत्री नाहीत, कृषिमंत्री टीईटी घोटाळ्यात अडकले आहेत. तोंडात विद्युत वाहिनी पकडून राज्यातील 145 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे या सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. सद्याचे सरकार अंबानी आणि अडाणीसाठी काम करणार आहे. अमित शहांसाठी काम करणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची राज्यात दुर्दशा सुरु झाली आहे.
तारीख पे तारीख सर्वोच्च न्यायालयाची दिली जाते. रामानंद हे न्यायाधीश निवृत्त झाले आहेत. नव्या न्यायाधीशांसमोर हा खटला चालणार आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळेल. उन्मेश पाटील यांनी भारतीय जनता पार्टी काय चालू आहे पहिल्यांदा पाहावं. तुमच्या पक्षात किती आमदार नाराज आहेत. पूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. उन्मेश पाटलांनी स्वतःच्या पक्षाचा विचार केला पाहिजे. निवडणुका लागल्या तर वाईट वाटून घेऊ नका बंडखोर आमदार अपात्र होतील. संदिपान भुमरे यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या. काँग्रेसला गाफील ठेवून यांना राष्ट्रवादी वाढवायची होती असे वक्तव्य खासदार जळगाव उनमेश पाटील यांनी केले होते. त्याला अमोल मिटकरी यांनी उत्तर दिले.