मुंबई 17 जुलै 2023 : आज अधिवेशनाचा (Monsoon session) पहिला दिवस असल्यामुळे सगळ्याचं लक्ष महाराष्ट्रातील विविध घडामोडीकडं लागलं आहे. विशेष म्हणजे भाजपने शिवसेनेचा एक गट आणि राष्ट्रवादीचा एक मोठा गट सोबत घेतल्यामुळे आज राजकीय घडामोडी घडण्याची अधिक शक्यता आहे. राष्ट्रवादीचा एक गट सोडून गेल्यानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. दोन्ही गटाने राष्ट्रवादी पक्ष (monsoon session of maharashtra legislature begins today) आमचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत संघर्ष होणार आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांना व्हीप लागू केला आहे. त्यामुळे पहिल्याचं दिवशी विधानभवनात राष्ट्रवादीतील दोन गटात (NCP Two group) संघर्ष पाहायला मिळणार आहे. काल राष्ट्रवादीच्या फुटलेल्या गटाने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे.
राष्ट्रवादीच्या एका गटाची व्यवस्था विरोधी पक्षात करावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. काल राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्या गटाने शरद पवारांची भेट घेतल्यामुळे पुन्हा राजकीय गोष्टींची चर्चा सुरु झाली होती. शरद पवार यांच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही. विरोधी पक्षांच्या बैठकीला शरद पवार हजर राहणार आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमिकेवर 70 वर्षे शरद पवार ठाम आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हिप जारी केला आहे अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
“गेल्या साडेतीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदारांना व्हीप बजाविण्याचे काम मी करतो आहे. उद्या देखील विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे सगळ्या आमदारांना व्हीप बजावले जातील, आमच्या पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्हीप बजावण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे.” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद व मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. “जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी व्हीप नाकारला तर त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील” असेही मंत्री अनिल पाटील म्हणाले.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. अधिवेशानात विविध मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिलं अधिवेशन आहे. त्यामुळे मोठमोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.