मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिलाय. आपल्या या भूमिकेवर ते आजही ठाम आहेत. राज यांनी आज एक पत्रक काढून आपली पुढील दिशा स्पष्ट केलीय. दरम्यान राज ठाकरे यांनी मशिदींविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. राज यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेची (Shivsena) चांगलीच कोंडी होत असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान राज यांनी आज काढलेल्या पत्रकात ‘प्रश्न असा आहे की, सर्व भोंगे हे अनधिकृत आहेत. भोंगेच कशाला, बहुतांश मशिदीही अनधिकृत आहेत. हे सरकार अनधिकृत मशिदीवरील भोंग्यांना (Loudspeaker on Mosque) अधिकृत परवानग्या का आणि कशी देते? आणि जर परवानगी देणारच असाल तर आम्हालाही हिंदू देवळांनाही भोगे लावण्याची परवानगी द्यायलाच हवी’, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलीय. अशावेळी मुंबईत पोलिसांनी 803 मशिदींना लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी दिल्याची माहिती एएनआयने दिलीय.
‘मुंबई पोलिसांनी 803 मशिदींना लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी दिली आहे. तर 1 हजार 144 मशिदींमधून लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी मागणारे अर्ज आले होते. तर सायलेंट झोनमध्ये असलेल्या मशिदींमध्ये लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी देण्यात आलेली नाही’.
Mumbai Police say it has allowed 803 mosques to install loudspeakers. Applications seeking permission to install loudspeakers were received from 1144 mosques. No permission given to install loudspeakers in mosques located in silent zone.
— ANI (@ANI) May 3, 2022
तर, भाजप नेते मोहित कंबोज यांनी याच मुद्द्यावरुन मशिद आणि मंदिराचा मुद्दा उपस्थित केलाय. ‘मुंबई पोलिसांनी 1144 अर्जांपैकी 803 मशिदींना लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी दिली आहे! मुंबईत 227 कॉर्पोरेशन वॉर्ड, त्यामुळे प्रत्येक वॉर्डात सरासरी 5 पेक्षा जास्त मशिदी! मुंबईत प्रत्येक प्रभागात 5 मंदिरे आहेत का?’, असा सवाल कंबोज यांनी केलाय.
Mumbai Police say it has allowed 803 mosques to install loudspeakers out of 1144 Applications !
227 Corporation Wards in Mumbai , So Average More Than 5 Mosques In Every Ward !
Do Every Ward Have 5 Temples In Mumbai ?
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) May 3, 2022
हिंदूंच्या सणांना सायलन्स झोन, शाळा, रुग्णालय अशा सर्व प्रकारच्या अटीशर्तीच्या नावाखाली मर्यादा घालायच्या, परंतु मशिदींना कोणत्याही प्रकारच्या अटी घालायच्या नाहीत! भारतीय संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसते? म्हणूनच हिंदूंनो,
1. त्यांना आपली हनुमान चालिसा ऐकवा
2. सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत.
3. मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या १०० या क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांचा त्रासाबाबत तक्रार करावी. रोज करावी.
सर्वांना आवाहन pic.twitter.com/SNgxd2GMTA
— Raj Thackeray (@RajThackeray) May 3, 2022