Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंकडून मोदींना पत्र, भेटीची मागणी

| Updated on: Sep 23, 2020 | 12:51 PM

संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली 20 पेक्षा जास्त सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने मोदींकडून भेटीची वेळ मागितली आहे.(MP Chhatrapati Sambhaji Raje Write letter to PM Narendra Modi)

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंकडून मोदींना पत्र, भेटीची मागणी
Follow us on

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वेळा पत्र लिहिलं आहे. या दोन्ही पत्रातून संभाजीराजेंनी पंतप्रधान  मोदींकडून भेटीसाठी वेळ मागितली आहे. मात्र अद्याप संभाजीराजेंना मोदींनी भेटीसाठी वेळ दिलेली नाही. (MP Chhatrapati Sambhaji Raje Write letter to PM Narendra Modi for Maratha Reservation Issue)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली 20 पेक्षा जास्त पक्षांच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींकडून भेटीची वेळ मागितली आहे. मात्र अद्याप मोदींनी खासदारांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ दिलेली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकार गंभीर दिसत नसल्याची टीका केली जात आहे.

नुकतंच संभाजीराजे यांनी मोदींना पत्र लिहित पुन्हा एका भेटीची मागणी केली आहे. मात्र दोन वेळा पत्र लिहिल्यानतंरही त्यांना याबाबत काही प्रत्युत्तर मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा – मराठा उमेदवारांना EWS चे लाभ, आंदोलकांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचे 8 मोठे निर्णय

दरम्यान मराठा आरक्षणाचा तिढा सर्वोच्च न्यायालयात सुटेपर्यंत ठाकरे सरकारने मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना दिलासा देण्यासाठी 8 मोठे निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यावर सुनावणी होऊन आरक्षणावरील स्थगिती आदेश रद्द होईपर्यंत मराठा समाजातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेला लाभ एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना देण्यात येईल. मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळात नोकरीत घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. प्रस्ताव जसे प्राप्त होतील, त्यापासून एका महिन्यात कार्यवाही करण्यात येईल.

तसेच मराठा क्रांती मोर्चामधील आंदोलकांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. आजमितीस शासनाकडे फक्त 26 प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यावरही एका महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, यासारखे 8 मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. (MP Chhatrapati Sambhaji Raje Write letter to PM Narendra Modi for Maratha Reservation Issue)

संबंधित बातम्या : 

मराठा आंदोलकांना नोटिसा पाठवू नयेत, छत्रपती संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं, उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र