प्रदूषणावरील बैठकीला दांडी मारुन जिलेबीवर ताव, गंभीर ट्रोल

| Updated on: Nov 15, 2019 | 4:17 PM

राजधानी दिल्ली आणि जवळपासच्या परिसरातील वायू प्रदूषणावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (15 नोव्हेंबर)एक बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, गौतम गंभीर या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

प्रदूषणावरील बैठकीला दांडी मारुन जिलेबीवर ताव, गंभीर ट्रोल
Follow us on

नवी दिल्ली : पूर्व दिल्‍ली (East Delhi) मतदारसंघातील भाजपचे खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर (Gautam Gambhir)सध्या ट्विटरवर ट्रोल होत आहेत. शहर विकासासाठी तयार करण्यात आलेल्या संसदेच्या स्थायी समितीचे ते सदस्य आहेत. या समितीचे दिल्लीचे ते एकमेव सदस्य आहेत. राजधानी दिल्ली आणि जवळपासच्या परिसरातील वायू प्रदूषणावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (15 नोव्हेंबर) एक बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, गौतम गंभीर या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. यदरम्यान, ते इंदूर येथील भारत विरुद्ध बांगलादेशच्या (India vs Bangladesh test) कसोटी सामन्यामध्ये कमेंट्री करण्यात व्यस्त आहेत (MP Gautam Gambhir trolled).

माजी क्रिकेटर व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी आज (15 नोव्हेंबर) इंदूर येथील एक फोटो ट्विट केला. यामध्ये गौतम गंभीर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि होस्ट जतिन सप्रू हे तिथे जिलेबी खाताना दिसत आहेत. गौतम गंभीरचा हा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे (MP Gautam Gambhir trolled).

सोशल मीडियावर गौतम गंभीर यांना टीकेला सामोरे जावं लागत आहे. त्याने कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावं यावरुन त्यांना झापलं जात आहे. दिल्लीमध्ये सत्तेत असलेली आम आदमी पक्षानेही त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

“भाजपने प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी संसदेच्या स्थायी समितीची बैठक बोलावली. दिल्ली महानगरपालिका आयुक्त आणि दिल्ली विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष या बैठकीत आलेच नाहीत. तर खासदार गौतम गंभीर फक्त ट्विटरवर उपदेश देतात मात्र या बैठकीला तेही उपस्थित नव्हते”, असं ट्वीट आपचे नेता सौरभ भारद्वाज यांनी केलं.

बैठकीला सदस्यांची दांडी

दिल्लीसह उत्तर भारतात सध्या प्रदूषणाचं साम्राज्य पसरलेलं आहे. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी जेव्हा समितीची बैठक बोलावण्यात आली. तेव्हा फक्त चार खासदार या बैठकीला पोहोचले. या बैठकीला 29 जणांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी समिती अध्यक्षा जगदंबिका पाल, हसनैन मसूदी, सी आर पाटील आणि संजय सिंह हे उपस्थित होते. मात्र, इतर समिती सदस्य आणि अधिकारी बैठकीला आलेच नाहीत.