गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नागपूर : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री (CM) असताना त्यांनी एवढा संघर्ष केला असता तर आज महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकत त्यांनी मिळवली असती. उद्धव ठाकरे म्हणतात बाप चोरून नेला, बाप चोरून नेला नाही तर तुम्ही ज्या बापाचे विचार बाजुला ठेवले ते विचार पुढे नेण्याचं काम शिंदे गट करत असल्याचा घणाघात राणा यांनी केला आहे. त्यांनी दसरा मेळाव्यावरून देखील उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात जबरदस्तीने लोक आणले जाणार आहेत, तर हिंदुत्त्व आणि बाळासाहेबांचे विचार ऐकायला लोक शिंदेंच्या मेळाव्याला गर्दी करतील असं राणा यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना नवनीत राणा यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे हे एक अपरिपक्व राजकारणी आहेत, त्यांच्या राजकीय वक्तव्यावरून ते परिपक्व आहे असं वाटत नाही. उध्दव ठाकरे बाळासाहेबांचे सुपुत्र आहे असं वाटत नाही. बाळासाहेबांनी जे मिळवलं त्याच्या दहा टक्केही उद्धव ठाकरे यांना मिळवता आलं नाही. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे जमिनीवर राहून संघर्ष करू शकत नसल्याची टीका नवनीत राणा यांनी केली आहे.
दरम्यान यावेळी नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. बच्चू कडू यांच स्वत:वर नियंत्रण राहिलं नाही. त्यांनी स्वत:ला सांभाळलं पाहिजे. कार्यकर्त्यांना मारणे हा कार्यकर्तांचा अपमान आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान त्यांनी ठेवायला हवा असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे,