पुणे : खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) हे उद्या म्हणजे शुक्रवारी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांची भेट घेणार आहेत. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मोर्चाची घोषणा केली आहे. येत्या 16 जूनपासून कोल्हापुरातून मराठा मोर्चाला (First Maratha Morcha) सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे उद्या उदयनराजेंना भेटणार आहेत. पुण्यात उद्या दुपारी 12 वाजता ही भेट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (MP Sambhaji Raje Chhatrapati to meet BJP MP Udayanraje Bhonsle tomorrow at Pune will discuss Maratha reservation Maratha Morcha)
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर, संभाजीराजेंनी महाराष्ट्र दौरा करुन सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. मात्र त्यांची आणि उदयनराजेंची भेट झाली नव्हती. आता दोन्ही राजेंची भेट ठरली आहे. उद्या पुण्यात भेटून दोन्ही राजे मराठा आरक्षणाच्या पुढील लढाईची दिशा ठरवणार आहेत.
दरम्यान, संभाजीराजेंनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा मोर्चाची रुपरेषा मांडली. येत्या 16 जूनला कोल्हापुरातून पहिला मराठा मोर्चा (First Maratha Morcha) काढण्यात येणार आहे. हे आंदोलन मूक असेल. या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी असेल. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.
संभाजीराजे छत्रपती हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असं भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं होतं. 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करायची वेळ येते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील (Maratha Reservation) भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र दौरा केला. यावेळी त्यांनी अनेक नेत्यांची गाठीभेटी घेतल्या. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
संबंधित बातम्या