अमरावती : आज वटसावित्री पौर्णिमा हा सण सगळीकडे उत्साहात साजरा केला जात आहे. महिला आज वडाच्या झाडाचे पूजन करून आपल्या पतीच्या दीर्घआयुष्यासाठी साकडं घालतात. सर्वसामान्य स्त्री पासून ते राजकीय नेत्यापर्यत सर्वच क्षेत्रातील स्त्रिया आज वडाच्या झाडाचे पूजन करून वटसावित्री (Vatsavitri) साजरी करत आहे.आज अमरावती दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही वट सावित्री पौर्णिमेनिमित्त अमरावतीत वडाच्या झाडाचे पूजन केले. यावेळी इतर महिलांनी सुप्रिया सुळे यांना उखाणा (Ukhana) घेण्याचा आग्रह केला. तेव्हा क्षणाची विलंब न लावता यांनी ‘ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंदराव फस्ट क्लास’ असा उखाणा घेतला. यावेळी चांगलाच हशा पिकला होता.
सुप्रिया सुळे या आज एकदिवसीय अमरावती शहराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती शहराचे आराध्य दैवत असलेल्या अंबा देवीचे व एकवीरा देवीचे दर्शन घेतले. तसेच यावेळी अंबादेवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून त्यांनी ओटीही भरली. मी मांदिरात कधीही मागायला येत नाही, मी आभार मानायला येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या देत असतील तर स्वागतच करेल. भारतातही नवीन पिढीला नोकरी मिळत असेल तर मनापासून मी स्वागतच करेल, अशी प्रतिक्रियाही सुप्रिया सुळे यांनी दिली.
आपले सगळे नेते विदर्भात येऊन पक्ष वाढेल कसा याचा प्रयत्न करत आहे. शेवटच्या माणसाचं काम आपल्याला मविआमधून करायचं आहे. मला धक्काच बसला आज, मोदी आज महाराष्ट्रामध्ये आले आणि दादांनी त्यांचा मान सन्मान केला. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देहू येथील कार्यक्रमाचा प्रोटोकॉल दाखवला. भाजपचे मित्र म्हणाले मोदी यांनी अजित दादा यांना भाषण करा म्हणता, हा अपमान आहे. अजित दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे.आपल्या पक्षाचा नेता आहे पण तीन नंबरला. देवेंद्र फडणवीसचे भाषण झाले नसते तर मी काहीच म्हटले नसते.
देवेंद्र फडणवीस भाषण करू शकतात तर मग अजित पवारांना तुम्ही भाषण करू द्यायला पाहिजे. भाजपमधील देवेंद्र फडणवीस भाषण करू शकतात, मग मविआमधील उपमुख्यमंत्री अजित दादा यांचे भाषण का नाही, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला. मोदीजी मै नाराज नही हूं हैराण हूं मै. हा महाराष्ट्रचा अपमान आहे. देवेंद्र फडणवीस यांचा पुण्याशी काय संबंध आहे, ते नागपूरमधून निवडून येतात. मोदीजी मला जेव्हा लोकसभेत भेटतील तेव्हा त्यांना मी हा प्रश्न विचारेल, असे सुप्रियाताई म्हणाल्या. (MP Supriya Sules special ukhana for her husband on the occasion of Vatpoornima)