आमदार आणि खासदार निधीचे पैसे कुठे गेले? केंद्रासह राज्याने उत्तर द्यावे, उदयनराजे संतापले

| Updated on: Oct 26, 2020 | 1:01 AM

हा सर्व खटाटोप पैशासाठी चालला आहे, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.  (MP Udayanraje Bhosale On Corona Pandemic)

आमदार आणि खासदार निधीचे पैसे कुठे गेले? केंद्रासह राज्याने उत्तर द्यावे, उदयनराजे संतापले
Follow us on

सातारा : भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कोरोनाच्या वाढत्या भरमसाठ बिलाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना काळात प्रत्येकाला बेड,व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. मग गेल्या दोन वर्षातील खासदार, आमदार निधीचे पैसे कुठे गेले? याचे उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने देणे गरजेचे आहे, असा संताप उदयनराजेंनी व्यक्त केला. हा सर्व खटाटोप पैशासाठी चालला आहे, असा आरोपही उदयनराजेंनी केला आहे.  (MP Udayanraje Bhosale On Corona Pandemic)

साताऱ्यात आज उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या ठिकाणी भवानी तलवारीचे साध्या पद्धतीने विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी परंपरागत सुरु असलेली शाही मिरवणूक कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन रद्द  करण्यात आली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राजघराण्याच्या वतीने सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. जगभरात कोरोनाचे सावट पसरल्याने विविध रुढी, परंपरा सण यावर्षी साजरे करता आले नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

या सणाच्या निमित्ताने जो लोकांमधील जिव्हाळा आहे. तो कोरोनाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे आई भवानी चरणी प्रार्थना करत हे कुठेतरी थांबले पाहिजे अशी भावना व्यक्त केली.

देशातील सर्व खासदार आणि आमदारांचे 2 वर्षातील संपूर्ण खासदार,आमदार निधी वर्ग करून घेतल्याने लोक आम्हाला जाब विचारत आहेत. मी महाराष्ट्र पुरता न बोलता हा निधी नेमके गेला कुठे? कोरोना काळात प्रत्येकाला बेड,व्हेंटिलेटर ची कमतरता भासत आहे. मग एवढे खासदार, आमदार निधीचे पैसे गेले कुठे याचे उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने देणे गरजेचे आहे, असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला.

“कोरोनाचा सर्व खटाटोप पैशांसाठी” 

“आई भवानी राज्यकर्त्यांना बुद्धी दे. ज्या लोकांनी राज्यकर्त्यांना निवडून दिले त्यांची काळजी नाही. त्यामुळे लोकांच्या विश्वासाला पात्र नसलेल्या राज्यकर्त्यांना पदावर राहण्याची लायकी नसल्याचे उदयनराजे यांनी यावेळी सांगितले.”  (MP Udayanraje Bhosale On Corona Pandemic)

“कोरोनाबाबतचे निर्णय जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिले असल्याने आणि प्रशासन लोकप्रतिनिधींचा अभिप्राय घेत नाही. त्यामुळे ही संपूर्ण यंत्रणा जनसामान्यांना विचारात घेऊन केली जात नाही. हा सर्व खटाटोप पैशासाठी चालला असल्याचा  आरोप उदयनराजे भोसले यांनी थेट प्रशासनावर केला आहे.”

“डॉक्टर, फिजीशिअनला वेतन वाढ द्या” 

“कोरोनाबाबत प्रांत, तहसीलदार, कलेक्टर यांच्या महसूल विभागाचा मेडिकल विभागाशी काय संबंध? याबाबत डॉक्टर, फिजीशिअन यांना मिळणाऱ्या वेतनात वाढ केली पाहिजे,” अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.

“प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लोक मारायला लागली आहेत. काही जण डोक्याने फक्त पैशाचा विचार करतात आणि मी फक्त भावनेचा विचार करतो. जर हिंमत असेल तर समोर येऊन बोला,” असा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे.

“जगात एवढे व्हायरल आहेत. त्यापैकी कोरोना एक आहे. पण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कोणाला कोरोना होऊ नये,” असेही उदयनराजे म्हणाले.

“जर हे असेच चालत राहिले तर सामान्य जनता पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरु देणार नाहीत. मला प्रश्न विचारायचे नाही. मला वेदना होतात म्हणून हे सर्व बोललो असल्याचे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.” (MP Udayanraje Bhosale On Corona Pandemic)

संबंधित बातम्या : 

साताऱ्याच्या राजघराण्यातील शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द, उदयनराजेंचा मोठा निर्णय

उदयनराजेंवर प्रकाश आंबेडकरांची टीका, संभाजी भिडेंची प्रतिक्रिया काय?