Sachin Vaze News live Updates मंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी भाजपने सरकारची कोंडी केली आहे. API सचिन वाझे यांच्या बदलीची घोषणा गृहमंत्र्यांनी केली असली, तरी त्यांना अटक करा अशी मागणी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह
मला कल्पना आहे, काही गैरसोय होतेय. पण सध्याचे दिवस असे आहेत, गर्दी करु नये.
गर्दी होऊ नये म्हणून मी विनंती केली, ती माध्यमांनी मानली धन्यवाद, गैरसोयीबद्दल दिलगिरी
आज अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण झालं. हे अधिवेशन घेणे कोरोना काळात आव्हान होतं. मात्र ते घेतलं. सर्वांचे धन्यवाद.
सर्वपक्षीय आमदार, विरोधी पक्ष यांनी उत्तम सहकार्य केलं. त्यामुळे धन्यवाद
परवा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी म्हणालो होतो, या आव्हानात्मक स्थितीत कोणतंही रडगाणं न गाता अर्थसंकल्प दिलासा देणारा मांडला. महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही..
अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर अधिवेशन संपलं.
दहा दिवसात जे जे झालं, त्याचे आपण साक्षीदार आहे. विधीमंडळात जे काही चालतं ते आपण जनतेसमोर पोहोचवले.
——
देवेंद्र फडणवीस लाईव्ह
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लबाड सरकार आज आम्हाला पाहायला मिळालं. ठाकरे सरकारचं नाव हे लबाड सरकार म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिलं जाईल. याचं कारण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाणार राणा भीमदेवी थाटात घोषित करायचं, सामान्य शेतकऱ्याचे वीजेचे मीटर कनेक्शन कापण्याची स्थगिती दिलीय, आणि शेवटच्या दिवशी, शेवटचा आयटम तोच ठेवून स्थगिती उठवायची ही सर्वात मोठी लबाडी आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी दिलेली कारणं पूर्णपणे चुकीची, असत्य, विसंगत आहेत. त्याच्यावरही आम्ही हक्कभंग निश्चित आणू. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला, गरीब वीज ग्राहकाला, या सरकारने शॉक दिलाय. हे लबाड सरकार आहे. – देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर 2500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. महाविकासआघाडी सरकार नौटंकी करत आहे. त्यांच्या नौटंकीमुळे राज्याचं नुकसान होतं आहे.
ठाकरे सरकार लबाड सरकार म्हणून इतिहासात नोंद घेतली जाईल. ग्रामीण आणि शहरी भागातील वीज ग्राहकांना शॉक देण्याचं काम केले आहे. सरकारनं शेतकऱ्यांना एक नवा पैसा दिला नाही. 2 लाखांच्यावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा नाही.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा नाही. पीक विम्याबाबत खोटी माहिती दिली गेली. पीक विम्याबाबत कंपनी निवडण्याचं काम राज्य सरकारचं आहे. पीक विम्यासंदर्भातील निकश राज्य सरकारनं निकष बदलले. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला नाही.
चार वर्षांच्या काळात एकही तक्रार आली नाही. शिवसेना त्यावेळी विमा कंपन्यांवर जाऊन फार्स करत होती.
शेतकऱ्यांशी लबाडी आणि धोका या सरकारनं केला आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सरकारचे धिंडवडे काढले आहेत.
सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही. सचिन वाझेंकरता अॅड उद्धव ठाकरे वकिल आहेत. सचिन वाझेंना डिफेंड करण्याचं काम उद्धव ठाकरेंना करावं लागते.
अधिवेशनात सत्तारुढ पक्ष उघडा पडला. वरच्या सभागृहात प्रविण दरेकर आणि विधानसभेत आमच्या टीमनं सरकारला निरुत्तर केले.
ओबीसी समाजाच्या संदर्भात त्यांच्या जागा कमी केल्या.
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण अडचणीत आणण्याचं काम झाल्याचं दिसतेय.
कोणालाही हे सरकार न्याय देऊ शकत नाही. केवळ सत्तेचे लचके तोडण्याकरता सोबत राहिलेले हे गठबंधन आहे.
कांजूरच्या जागेला आता आरक्षित करण्याचं काम करण्यात आलं आहे. कांजूरच्या जागेवर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांनी आक्षेप घेतले होते. त्यानंतरही त्यांनी आरक्षण टाकलं.
मुख्यमंत्र्यांचं सभागृहातील तणाव असताना त्यावर मार्ग काढण्याचं कामं असते. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे नवी प्रथा तयार करत आहेत. सरकार बॅकफूटवर होते, त्यांनी अधिवेशनातून पळ काढला आहे.
आम्ही कोणतीही माघार घेतली नाही. सरकारला चर्चा नको होती त्यामुळे आम्ही अट ठेवली. जनहिताचे मुद्दे मांडली.
माझ्याकडे असणारी कागदपत्रे त्यांच्याकडे पाठवणार आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक प्रकल्पाला शिवसेनेला विरोध केला आहे. नाणारमध्ये गेल्यानंतर तेथील लोकांचं समर्थन आहे. ही कोस्टल रिफायनरी त्यामुळे नाणार येथेच ती रिफायनरी व्हावी. शिवसेनेने केवळ विरोधाकरिता विरोध करु नये, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
13 कोटी जनतेच्या आयुष्याशी संबंधित अर्थसंकल्प जाहीर झालाय. 13 कोटी जनतेच्या आशीर्वादावर काम करत आहोत. त्यांच्याकडे लक्ष देणं सरकारचं प्राधान्य आहे.
नाणारच्या जनतेचा प्रकल्पाला विरोध आहे. नाणारच्या जनतेच्या मताला शिवसेनेचा पाठिंबा आहे.
नाणारला पर्यायी जागा आहे. नाणार प्रकल्पाचं दुसऱ्या ठिकाणी स्थानिक जनतेचा पाठिंबा असेल तर त्या ठिकाणी प्रकल्प होईल.
कांजूरमार्ग
कांजूरमार्गला कारशेड करणं राज्याचं हिताचं आहे. आरेला कारशेड हे काही वर्षात कमी पडली असती. मुंबईला, राज्याला न्याय मिळेल.
कांजूरला कारशेड केल्यास पुढच्या पन्नास आणि शंभर वर्षासाठी फायदेशीर ठरेल. अंबरनाथ आणि बदलापूरच्या लोकांना उपनगरात जाता येईल.
प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रणा आहे. त्यांची तपास यंत्रणा भारी असेल तर पोलीस यंत्रणा रद्द करुन टाकायची का?
सचिन वाझे पूर्वी शिवसेनेत होते. त्यांनी सदस्यत्व पुन्हा घेतलेलं नाही. त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही. सर्व विषयात निपक्षपातीपणे पाहायचा चष्मा लावा.
राज्य सरकारकडे असणारं तारतम्य विरोधकांनी बाळगलं पाहिजे.
सीडीआर तपास यंत्रणेला द्या, त्यातील माहिती तपासू द्या. त्यावर पटकन भाष्य करणं योग्य नाही.
लॉकडाऊन करण्याची इच्छा नाही. आम्हालाही लोकांवर निर्बंध लावायचे नाहीत.
कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.
विरोधी पक्षनेत्यांकडे सीडीआर मागितला आहे. न्यायाची पद्धत असतील तर त्यांनी जाहीर करावं.
महावितरण कंपनीवर बोजा वाढत चालला आहे. महावितरणं कंपनीनं मार्च 2022 पर्यंत वीज बिल भरावी अशी अपेक्षा ठेवली. महावितरण कसं चालवायचं असा प्रश्न असल्यानं नाईलाजानं निर्णय घ्यावा लागला.
कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली होती. पीक विम्याचं पूर्णपणे निर्णय केंद्र सरकार घेते. केंद्र काही, राज्य काही आणि शेतकरी काही रक्कम भरतात. सध्या कंपन्यांचा फायदा होतोय. दादाजी भुसे लवकर बरे झाले तर त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करु, असं सभागृहात सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार भेटायला आले. सचिन वाझे यांना हटवल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
संसदीय कामकाज व्हावं म्हणून निर्णय घेण्यात आला. वरिष्ठ सभागृहात अनिल देशमुख बोलत होते. संसदीय कार्यमंत्री अनिल परब आणि मी बसलो, मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि बदलीचा निर्णय झाला, असं अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतात.
अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला. तीन पक्षांना वाटेल त्यावेळी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ असं अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशन संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहेत. सर्वांची गैरसोय झाल्याची कल्पना आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपन्न झालं. कोरोनाच्या काळात हे आव्हानात्मक होतं. सर्वांना धन्यवाद देतो. विरोधीपक्षांसह सर्वांना धन्यवाद देतो.
महाराष्ट्र थाबंला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही,या सूत्रानुसार अर्थसंकल्प मांडला गेला.
10 दिवसांमध्ये काय झालं याचे आपण साक्षीदार आहोत. ते सर्व तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवलं आहे.
वीज तोडणीवरील स्थगिती उठवली, ऊर्जा मंत्री बाहेरगावी गेले होते.
निती आयोगामधे चर्चा झाली. केंद्राचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी सातत्यानं आहोत असं सागतेय तर त्यांनी ते करुन दाखवावं.
मृत्यू झाल्यानंतर दखल घेणं सरकारचं काम आहे. हिरेन प्रकरणाप्रमाणं मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचं प्रकरण आहे. त्यामध्ये नावं आहेत. तपास सुरु आहे जिलेटीन कांड्या प्रकरणी तपास सुरु आहे. फाशी द्या आणि तपास करा ही पद्धत होऊ शकत नाही.
चारित्र्यहनन करायचे, धिंडवडे काढायचे, कोणीही दोषी असेल त्यावर सरकार कारवाई करेल. कोणताही मृत्यू असो, हिरेन यांचा मृत्यू, डेलकर यांचा मृत्यू असेल तपासात कोणी सापडेल त्याला दया मया दाखवली जाणार नाही.
सचिन वाझे हे ओसामा बिन लादेन असल्यासारखं वातावरण तयार केलं जात आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं असून 5 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे.
नागपुरात आज मोठा कोरोना ब्लास्ट
नागपुरात आज 1710 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
दिवसभरात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
दिवसभरात 947 जण कोरोनामुक्त
नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या 162053 वर
आतापर्यंत 145472 जण कोरोनामुक्त
नागपुरात आतापर्यंत 4415जणांचा मृत्यू
नागपुरातील कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण 90.13 टक्के
एक गाडी माझ्या गाडीचा पाठलाग करत असून त्याचा नंबर बनावट आहे. या गाडीवर पोलीस असं लिहिलं आहे. मात्र हा नंबर बनावट आहे, सचिन वाझे यांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीवरुन मुंबईत दाखल, मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले, आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता
पोलीस आयुक्त आणि सचिन वाझे यांची बैठक संपली. अधिकृत भूमिका थोड्याच वेळात जाहीर करेन, असं सचिन वाझे म्हणाले.
मागील अडीच तासांपासून एटीएस कार्यालयात डीसीपी राजकुमार शिंदे आहेत. ते कार्यालयात आल्यापासून वेगवेगळ्या टीम कार्यालयातून बाहेर पडल्या होत्या. या टीमने ठाण्यातील मनसुख हिरेन यांच्या घरी, यासोबतच विविध बँकांमध्ये जाऊन चौकशी केली आहे. यामध्ये टिजेएसबी बँक, सारस्वत बँक, आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे. यानंतर आता ही टीम पुन्हा एकदा एटीएस कार्यालयात पोहोचली असून सोबत हिरेन यांच्या कुटुंबियांना देखील घेऊन आले आहेत.
पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सहआयुक्त क्राईम मिलिंद भारंबे आणि सचिन वाझे यांची बैठक सुरु,
सचिन वाझे यांच्या बदलीचा प्रस्ताव क्राईम ब्रांच मार्फत पोलीस आयुक्त यांना पाठवला जाईल. त्यानंतर पोलीस आयुक्त त्यावर सही करतील आणि त्यानंतर तो प्रस्ताव जॉईंट सीपी प्रशासन यांच्याकडे पाठवला जाईल . मग जॉईंट सीपी प्रशासन यांच्या विभागातर्फे बदलीचा आदेश निघेल.
महाशिवरात्री दिवशी इचलकरंजी शहरातील सर्व शिव मंदिरं बंद राहणार
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व महादेव मंदिरे बंद राहणार
शहरातील महादेव मंदिर समोर उद्या असणार पोलीस बंदोबस्त भाविकांनी मंदिरामध्ये येऊ नये प्रशासनाने केली विनंती
शहरातील नागरिकांनी शासनाने दिलेले नियम पाळावे माझे कुटुंब माझी जबाबदारी
देऊळ बंद, शहापूर मधील गंगा देवस्थान येथील महाशिवरात्रीवर बंदी, मंदिरामध्ये यावर्षी भाविकांना परवानगी नाही, गंगादेवस्थान येथील महादेव मंदिरातील महाशिवरात्री उत्सव यंदा भाविकांविना
मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएस करत आहे. गाडीचा तपास एनआयए करत आहे. सत्य बाहेर येईल. विरोधी पक्षाकडून सचिन वाझे यांचा चार्ज काढण्याची मागणी केली होती. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना दुसरा चार्ज देण्याची घोषणा केली आहे. चौकशी न करता कारवाई करण्याची मागणी योग्य नाही. सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही, असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सचिन वाझेंना क्राईम ब्राँचमधून दुसऱ्या ठिकाणावर पाठणार असल्याची घोषणा केली. विधानपरिषदेत अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.
सचिन वाझे 2 वाजता प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत. विधानसभेत काय झालं, विरोधकांनी काय आरोप केले, सत्य काय आहे, याबद्दल आपली अधिकृत भुमिका मांडणार असल्याची माहिती
वाझे प्रकरण आणि गदारोळ यावरून एनसीपी अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच दूरध्वनीवरून चर्चा
सभागृहात वझे प्रकरण यावरून विरोधक आक्रमक होतात, सभागृहात काल दिवसभर तहकूब झाले होते,
या प्रकरणावरून आज काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा पवार आणि एनसीपी नेत्यांत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती
आज बजेट मंजूरी करून घेणे हीच भूमिका सत्ताधारी पक्षाची ठेवण्याच्या सूचना केल्याची माहिती